परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी बुद्धीपलीकडील देव नसतो’, असे म्हणणे, हे बालवाडीतील मुलाने वैद्य, अधिवक्ता इत्यादी नसतात’, असे म्हणण्यासारखे आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘जमात ए पुरोगाम्यां’नी असत्याचा मुलामा देत पाठराखण करणे, हीच खरी समस्या !

धडधडीतपणे समोर उभ्या असलेल्या समस्येला सातत्याने नाकारत रहाणे आणि असत्याचा मुलामा देत तिची पाठराखण करणे, हीच खरी समस्या असल्याचे चित्र आहे. येथून पुढे शहामृगी पवित्रा न ठेवता समस्येला तोंड देत तिचा योग्य तो बंदोबस्त करणे, हाच पर्याय शेष आहे.

हिंदूंनो, धर्मशिक्षणाचा अभाव किंवा धर्मद्रोह यांमुळे होणार्‍या अपप्रचाराला बळी पडू नका !

हिंदूंनो, आपट्याचे पान देण्यामागील पुढील दृष्टीकोन समजून घ्या ! एकमेकांना आपट्याचे पान दिल्यामुळे दोन्ही व्यक्तींतील त्याग आणि प्रीती यांत वाढ होते आणि दसर्‍याच्या दिवशी आपट्याचे पान देणे, हे सौजन्यता, समृद्धता आणि संपन्नता दर्शवते !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘साधना करून सूक्ष्मातील कळायला लागले की, यज्ञाचे महत्त्व कळते. ते न कळल्याने अतिशहाणे बुद्धीप्रामाण्यवादी ‘यज्ञात वस्तू जाळण्यापेक्षा त्या गरिबांना द्या’, असे बडबडतात.’ –  (परात्पर   गुरु) डॉ. आठवले