संस्कृती संवर्धन आणि विकास महासंघ अन् विविध धार्मिक संस्था यांचा आयोजनात सहभाग !

चिंचवड (जिल्हा पुणे), २९ मार्च (वार्ता.) – चैत्र शुक्ल प्रतिपदा, ३० मार्च गुढीपाडवा अर्थात् हिंदु नववर्षानिमित्त सायं. ५ वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. संस्कृती संवर्धन आणि विकास महासंघ, पतंजलि योग समिती, आर्ट ऑफ लिव्हिंग, गायत्री परिवार, चिन्मय मिशन, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती अशा अनेक आध्यात्मिक, धार्मिक संस्था, तसेच गणेश मंडळे अन् विविध सामाजिक संस्था यामध्ये सहभागी होणार आहेत. या शोभायात्रेचा प्रारंभ श्री दत्त मंदिर, श्रीधरनगर, चिंचवडगाव येथून होणार असून समाप्ती श्री धनेश्वर मंदिर, चिंचवड येथे होईल. अधिकाधिक हिंदु बांधवांनी या शोभायात्रेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
शोभायात्रा मार्ग – दत्त मंदिर – लिंक रोड – शिवाजी उदय मंडळ – काकडे पार्क – विवेक वसाहत – साई मंदिर – पॉवर हाऊस चौक मार्गे मोरया गोसावी मंदिर येथून धनेश्वर मंदिर येथे सांगता होईल.