परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘खरे बुद्धीप्रामाण्यवादी प्रयोग करून निष्कर्षाला येतात. याउलट स्वतःला बुद्धीप्रामाण्यवादी म्हणवणारे साधनेचे, अध्यात्माचे प्रयोग न करता ‘ते खोटे आहेत’, असे म्हणतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘खरे बुद्धीप्रामाण्यवादी प्रयोग करून निष्कर्षाला येतात. याउलट स्वतःला बुद्धीप्रामाण्यवादी म्हणवणारे साधनेचे, अध्यात्माचे प्रयोग न करता ‘ते खोटे आहेत’, असे म्हणतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘सहस्रो वर्षांपूर्वी ऋषि-मुनींनी सांगितलेल्या मूलभूत सिद्धांतात कुणी काही पालट करू शकत नाही; कारण त्यांनी चिरंतन सत्य सांगितले आहे. त्यामुळे त्यात ‘संशोधन’ असे काही नसते. याउलट बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या विज्ञानात ‘संशोधन’ सतत करावे लागते; कारण त्यांचे सिद्धांत काही वर्षांनी पालटत असतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी बुद्धीपलीकडील देव नसतो’, असे म्हणणे, हे बालवाडीतील मुलाने वैद्य, अधिवक्ता इत्यादी नसतात’, असे म्हणण्यासारखे आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
धडधडीतपणे समोर उभ्या असलेल्या समस्येला सातत्याने नाकारत रहाणे आणि असत्याचा मुलामा देत तिची पाठराखण करणे, हीच खरी समस्या असल्याचे चित्र आहे. येथून पुढे शहामृगी पवित्रा न ठेवता समस्येला तोंड देत तिचा योग्य तो बंदोबस्त करणे, हाच पर्याय शेष आहे.
हिंदूंनो, आपट्याचे पान देण्यामागील पुढील दृष्टीकोन समजून घ्या ! एकमेकांना आपट्याचे पान दिल्यामुळे दोन्ही व्यक्तींतील त्याग आणि प्रीती यांत वाढ होते आणि दसर्याच्या दिवशी आपट्याचे पान देणे, हे सौजन्यता, समृद्धता आणि संपन्नता दर्शवते !
‘साधना करून सूक्ष्मातील कळायला लागले की, यज्ञाचे महत्त्व कळते. ते न कळल्याने अतिशहाणे बुद्धीप्रामाण्यवादी ‘यज्ञात वस्तू जाळण्यापेक्षा त्या गरिबांना द्या’, असे बडबडतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले