‘जैन सोशल फेडरेशन’च्या वतीने आनंदधाममध्ये ‘भगवान महावीर व्याख्यानमाला’ !

मानव सेवेची शिकवण देणार्‍या राष्ट्रसंत आचार्य सम्राट पू. श्री. आनंदऋषीजी महाराज यांच्या ३३ वा पुण्य स्मृतीदिन आणि १२५ व्या जन्मोत्सवानिमित्त२१ ते २७ मार्च २०२५ या कालावधीत सायंकाळी ७ वाजता आनंदधाममध्ये ‘भगवान महावीर व्याख्यानमाले’चे आयोजन करण्यात आले आहे.

कोथरूड येथे २१ मार्चला ‘पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’ !

‘आपला परिसर’ आणि ‘तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान’ यांच्या वतीने आयोजित देशभरातील संगीत महोत्सवात मानाचे स्थान प्राप्त केलेला ‘पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’ या वर्षी २१ ते २३ मार्च या कालावधीत कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे.

संताजी घोरपडे यांच्या पराक्रमाच्या स्मरणार्थ भाळवणी आणि कारखेव येथे स्मारक उभारणार !

छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतरच्या काळात संताजी घोरपडे यांनी आपले कौशल्य दाखवत औरंगजेबाच्या विरोधात लढा दिला. त्याच्या साडेतीन लाखांच्या छावणीत ४०० ते ५०० मावळ्यांसह शिरून त्यांनी मुख्य तंबूचा कळस हिसकावून मोगल सैन्याला मराठा सैन्याची शक्ती दाखवून दिली.

अतिक्रमण आणि प्रदूषण यांच्या विळख्यात मुठा कालवा !

मुठा उजवा कालवा हा पुण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी महत्त्वाचा असून, त्याच्या आजूबाजूला वाढलेली अतिक्रमणे आणि प्रदूषण यांमुळे तो धोक्यात आला आहे. जलसंपदा विभागाकडे अतिक्रमण हटवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असूनही कारवाई होत नाही, हे अत्यंत गंभीर आहे.

परभणी येथील तुळजाभवानी मंदिराच्या बाजूचे मांसाहारी उपाहारगृह बंद पाडले !

हिंदूंच्या मंदिरांच्या शेजारी मांसाहारी उपाहारगृहांना अनुमती प्रशासनाकडून कशी दिली जाते ?

सानपाडा ए.पी.एम्.सी. येथे भव्य शिवजयंती सोहळ्याचे आयोजन !

शिवबा मित्र मंडळ आणि सानपाडा युवा सामाजिक संथा त्यांच्या वतीने १७ मार्च या दिवशी शिवसेना शाखा सानपाडा गाव येथे शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने सकाळी रक्तदान शिबिर, विनामूल्य नेत्रचिकित्सा शिबिर होणार आहे.

आज वाशी येथे बजरंग दलाचे आंदोलन !

औरंगजेबाची कबर उखडून काढण्याच्या मागणीसाठी बजरंग दल, नवी मुंबईच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी येथे १७ मार्च या दिवशी आंदोलन करण्यात येणार आहे.

खाण व्यवसाय पूर्णत: चालू होण्यातील अडचणी सोडवण्यासाठी उच्चस्तरीय मंडळ स्थापन करणार ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोव्यात खाण व्यवसाय पूर्णपणे चालू करण्यामध्ये येणार्‍या अडचणी सोडवण्यासाठी उच्चस्तरीय मंडळ स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

धुळवडीच्या पार्श्वभूमीवर २७२ जणांवर पोलिसांची कारवाई !

पोलीस आयुक्तालयात २५ ठिकाणी ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ या संदर्भात विशेष मोहीम राबवण्यात आली. यामध्ये २७२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. हे खटले पुढील काही दिवसांत न्यायालयात पाठवले जाणार आहेत.

पुरातन मंदिरांचे जतन हे महत्त्वाचे कार्य ! – डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य

केवळ आर्थिक प्राप्तीसाठी नवीन मंदिरे उभारण्यापेक्षा मोठी परंपरा असलेल्या जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार करून त्यांची देखभाल आणि व्यवस्थापन करणे, हे मोठे कार्य असल्याचे प्रतिपादन मन्मथधाम संस्थान, कपिलधार येथील सद्गुरु डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य यांनी केले.