शाकाहार, योगाभ्यास आणि ध्यान हे माझ्या यशाचे रहस्य ! – प्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविच

ऑस्ट्रेलियन ओपन ही टेनिस स्पर्धा ८ वेळा जिंकणारे सर्बिया देशाचे टेनिसपटू नोवाक जोकोविच यांनी त्यांच्या यशाचे श्रेय शाकाहार, योगाभ्यास आणि ध्यान यांना दिले आहे. तसेच ‘मी अन्य खेळाडूंनाही यासाठी प्रेरित करू इच्छितो’, असेही त्यांनी म्हटले आहे.