गोव्यात दिवसभरात ५३ कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर १ सहस्र ५६२ नवीन रुग्ण

गोव्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या २ सहस्र ४९९ ने घटून २५ सहस्र ७५३ झाली आहे.

गोमेकॉत ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत केल्याविषयी गोवा खंडपिठाने राज्यशासनाची केली प्रशंसा !

गोमेकॉतील ऑक्सिजनचा प्रश्‍न सोडवण्यास आणखी विलंब झाल्यास त्याचे पुढे पुष्कळ दुष्परिणाम सर्वांना भोगावे लागले असते.

लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोलापूर महापालिकेत बालरोगतज्ञांची बैठक

सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून महापौर आणि आयुक्त यांच्या निर्देशानुसार कोरोनाची तिसरी लाट आणि लहान मुलांची कोरोना संसर्गापासून दक्षता घेण्यासंदर्भात आराखडा सिद्ध करण्यात येत आहे.

पुणे जिल्ह्यात विनाकारण फिरणार्‍यांचे वाहन जप्त करण्याचे पोलिसांना अधिकार

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पोलिसांना यासंदर्भातील अधिकार दिले असून दळणवळण बंदी संपेपर्यंत किंवा आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असेपर्यंत वाहने परत देऊ नयेत, अशा सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या आहेत.

‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे गोव्यात वीज खात्याची मोठ्या प्रमाणावर हानी

गोवा राज्यात १६ मे या दिवशी धडकलेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे वीज खाते आणि कृषी उत्पादने यांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे, तसेच शेकडो घरांची पडझड झाली आहे.

सोलापूर महापालिका क्षेत्रात प्रवेश करणार्‍यांना ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी अहवाल बंधनकारक

शहरातील किराणा, भाजी, फळे, मांस विक्रीची दुकाने १५ मेपासून सकाळी ७ ते ११ या वेळेत चालू असणार आहेत, असे आदेश महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले.

मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात भाजप कार्यकर्ते सहभागी होणार ! – दीपक शिंदे, सांगली शहर जिल्हाध्यक्ष, भाजप

कोल्हापूर – मराठा आरक्षणाच्या कायदेशीर लढाईत महाविकास आघाडी सरकारने कच खाल्ल्याने आता आरक्षण मिळवण्यासाठी समाजाकडून जी आंदोलनात्मक पावले टाकली जातील, त्यात भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षाची ओळख बाजूला ठेवून मराठा आंदोलकांच्या खांद्याला खांदा लावून सहभागी होईल, अशी ग्वाही भाजपचे मा. शिंदे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. या पत्रकात पुढे म्हटले आहे की, मराठा समाजास आरक्षण देण्याची … Read more

सतना (मध्यप्रदेश) येथे कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना भगवान श्रीरामाचे नाव लिहिण्याची शिक्षा !

पोलिसांनी नियम मोडणार्‍या नागरिकांना पकडून ३० ते ४० मिनिटे त्याच्यांकडून रामाचे नाव लिहून घेण्याचा उपाय चालू केला आहे.

DRDO चे कोरोनावरील औषध ‘२ डीजी’ हे रुग्णांना वापरण्यासाठी उपलब्ध !

हे औषध पावडरच्या रूपात असणार आहे. हे औषध रुग्णालयात असलेल्या रुग्णांचे ऑक्सिजनवरील अवलंबित्व न्यून करते.

पुण्यात कोरोना नियमावलीचे उल्लंघन करत गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेत १२५ दुचाकींची रॅली

दळणवळण बंदी असतांना पुणे शहरात १०० ते १२५ दुचाकींच्या रॅलीमध्ये गुंडाची अंत्ययात्रा निघते, याचा अर्थ गुंडांना कायद्याचे भय राहिले नाही.