गोव्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे पर्यटकांच्या संख्येत घट ! – मुख्यमंत्री

गोव्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे पर्यटकांच्या संख्येत घट होत आहे. विशेषत: उत्तर गोव्यातील किनारपट्टी भागातील ‘शॅक्स्’ (‘शॅक्स्’ म्हणजे समुद्रकिनारपट्टीवरील मद्यालय आणि उपहारगृह) आणि उपहारगृहे यांच्या मालकांनी कायदा हातात घेऊ नये.

साहित्यिक उदय भेंब्रे यांच्या विरोधातील सर्व तक्रारी फातोर्डा पोलीस ठाण्यात वर्ग : अन्वेषणाला प्रारंभ

कोकणी साहित्यिक उदय भेंब्रे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारे विधान केले होते. यानंतर साहित्यिक उदय भेंब्रे यांच्या विरोधात गोवा राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक तक्रारी प्रविष्ट (दाखल) झालेल्या आहेत.

तांबुळी शाळेत विद्यार्थ्यांना विनाकारण मारहाण : शिक्षकाच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

तालुक्यातील तांबुळी येथील पूर्ण प्राथमिक शाळेत ८ दिवसांपूर्वी सेवारत झालेल्या एका शिक्षकाने मद्याच्या नशेत प्राथमिक शाळेतील इयत्ता १ ली ते ७ वीपर्यंतच्या एकूण ९ विद्यार्थ्यांना विनाकारण मारहाण केल्याचे समजल्यानंतर पालक आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे.

बर्लिन : गोवा राज्य प्रतिष्ठित ‘पटवा आंतरराष्ट्रीय प्रवास पुरस्कारां’नी सन्मानित गोव्याला मिळाले २ पुरस्कार

‘आयटीबी (इंटरनॅशनल टुरिझम बोर्स) बर्लिन २०२५’ या जगातील सर्वांत मोठ्या पर्यटन व्यापार मेळाव्यामध्ये गोवा राज्याला २ ‘पटवा आंतरराष्ट्र्रीय प्रवास पुरस्कारां’नी’सन्मानित करण्यात आले आहे.

कुदळवाडी येथील कारवाईविषयी खासदार अमोल कोल्हे यांनी महापालिकेकडे अहवाल मागितला !

कुदळवाडी ‘मिनी पाकिस्तान’ म्हणून प्रसिद्ध आहेच, तसेच बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांच्या वस्त्यांमुळे कुप्रसिद्धही आहे ! असे असतांना अनधिकृत बांधकाम उद्ध्वस्त केले, तर या लोकप्रतिनिधींना खेद वाटण्याचे कारणच काय ? विशिष्ट समाजातील लोकांसाठी कळवळा आहे का ?

खासगी आस्‍थापनांना नोकर्‍यांच्‍या रिक्‍त जागांसाठी गोव्‍यातच जाहिराती करणे बंधनकारक ! – मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

खासगी आस्‍थापनांनी नोकर्‍यांच्‍या रिक्‍त जागांसाठी गोव्‍यातच जाहिराती देणे बंधनकारक आहे, अन्‍यथा वेगवेगळ्‍या वर्गवारीनुसार ३० सहस्र रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय ६ मार्च या दिवशी झालेल्‍या मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत घेण्‍यात आला.

यवतमाळ जिल्ह्यातील बसस्थानकांमध्ये प्रतिदिन चोरी !

सुरक्षारक्षकांची पदे आणि पोलीस चौक्यांची मान्यता असतांनाही त्यांची पूर्तता न करता प्रवाशांना वार्‍यावर सोडणारी प्रशासनव्यवस्था काय कामाची ?

(म्हणे) ‘मला भारतात पाठवू नका, तेथे माझा छळ होईल !’

मुंबईवरील आक्रमणात १९६ लोकांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण घायाळ झाले होते. त्याविषयी राणाला दुःख नाही; मात्र कथित छळाचे त्याला दुःख वाटते !

भारतात सर्व न्यायालयांत मिळून एकूण ५ कोटी २५ लाख खटले प्रलंबित !

या स्थितीवर युद्धस्तरावर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना काढणे आवश्यक आहे !

Pandit Dhirendra Krishna Shastri : औरंगजेबाला महान म्हणणे देशाचे दुर्दैव !

काळ पालटत आहे आणि एकपाठोठ एक सर्व ठीक होईल. प्राचीन भारतीय संस्कृतीचा ध्वज पुन्हा एकदा फडकेल. मला ठाम विश्‍वास आहे की, भारत अपरिहार्य रूपाने हिंदु राष्ट्र बनेल !