गांधी हत्येमध्ये कोणत्याही प्रकारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना गोवून हिंदुत्वाच्या चळवळीला चिरडून टाकण्यासाठी नेहरू सरकारने केलेल्या कुटील कारवाया !
‘नथुराम गोडसे यांनी ३० जानेवारी १९४८ या दिवशी नवी देहली येथे गांधीजींची हत्या केली. या हत्येमध्ये येनकेन प्रकारेण स्वातंत्र्यवीर सावरकर यांना गोवून हिंदुत्ववाच्या वाढत्या चळवळीला चिरडून टाकण्याचा चंग तत्कालीन नेहरू शासनाने बांधला होता.