विवाह संस्थेवरील संकट !

पुणे शहरातील सोळाव्या वयापूर्वीच्या सरासरी ७५ टक्क्यांहून अधिक मुले-मुली एका तरी ‘रिलेशनशिप’मध्ये गुंतल्याचे ‘प्रयास’ संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले.

छत्रपती शिवरायांचा मावळा व्हा !

आज अनेक ठिकाणी हिंदु धर्म आणि देवता यांचा अवमान, ‘लव्ह जिहाद’, गोरक्षकांवरील आक्रमणे, धर्मांतर यांसारख्या घटना घडत आहेत. या घटनांवर अनेक हिंदु धर्मीय व्यक्ती सामाजिक माध्यमांत निषेध व्यक्त करणे, तसेच या घटनांवर चर्चा करतांना वा राग व्यक्त करतांना दिसून येतात.

निष्क्रीय पुरातत्व विभाग !

पुरातत्व खात्याचे जर थोडक्यात वर्णन करायचे झाल्यास ‘स्वत: काही न करणे, इतरांना काही करू न देणे आणि कुणी काही करत असेल, तर त्यात खोडा घालणे’, असे करता येईल.

कपडे कि विचार ?

काही जणांना नवनवीन कपडे खरेदीची पुष्कळ हौस असते. त्या कपड्यांतून कालांतराने ‘कपड्यांचे दुकान’ चालू करता येईल, अशी स्थिती होतेे. ही गंमत नाही, तर वस्तूस्थिती आहे.

आपण खरोखर शिवप्रेमी आहात का ?

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील मनामनांत १९ फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवरायांविषयीची पवित्र भावना जागृत झाली; परंतु या भावनांचा महापूर तात्पुरताच रहात असेल, तर यात पालट होणे अपेक्षित आहे. छत्रपतींच्या विचारांना आपल्या आचार-विचारांमध्ये कितपत स्थान आहे ? हे शिवरायांना मानणार्‍या प्रत्येकाने स्वत:मध्ये शोधायला हवे.

गुन्हेगारीचा वाढता आलेख !

गुन्हेगारांना कठोर शिक्षा करणे, गुन्हेगारांवर कारवाईचे प्रयत्न तत्परतेने करणे आवश्यक आहेच; पण त्याही पुढे जाऊन गुन्हेगारी समूळ नष्ट होण्यासाठी, त्यांना चांगला माणूस बनवण्यासाठी धर्मशिक्षण देऊन नीतीमान करणे आवश्यक आहे !

राजकारणाला गुन्हेगारीचे ग्रहण !

अलीकडील काळात राजकारणातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसून येते. निवडून आलेल्या अनेक लोकप्रतिनिधींवर गंभीर गुन्हे नोंद असल्याची आकडेवारी समोर आली आहे. यामुळे राजकारणातील गुन्हेगारीची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली आहे.

आतंकवादाचा बीमोड कधी ?

भारतातील आतंकवाद नष्ट करायचा असेल, तर त्यासाठी त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे निःस्वार्थी आणि प्रखर राष्ट्रभक्त असणारे शासनकर्ते आवश्यक आहेत, हेच खरे !

दिशाहीन झालेली राष्ट्राची पिढी !

प्रचलित शिक्षणव्यवस्थेत विद्यार्थी मानसिक रुग्ण बनत चालला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचे मन व्यापक होईल, असे शिक्षण त्यांना देणे आवश्यक आहे. आपल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण आहे. त्यांनी श्री भवानीमातेची उपासना करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.

स्वार्थांधतेची परिसीमा !

एखाद्या संकटात संपूर्ण जगच होरपळून निघत असेल, तेव्हा अशा संकटकाळातही काही भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणा आर्थिक लाभासाठी खालच्या पातळीला जातात, अशा वेळी सामान्य माणसाचे मन अस्वस्थ होते.