Due to a software update, our website may be briefly unavailable on Saturday, 18th Jan 2020, from 10.00 AM IST to 11.30 PM IST

श्री शिवकार्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्याला पोलिसांकडून दमदाटी

वैध मार्गाने विरोध करण्याचा अधिकार घटनेने प्रत्येकाला दिला असतांना दमदाटी करणे, म्हणजे घटनेने दिलेल्या अधिकाराचे हनन होय. श्री. करूण पालांडे यांच्याविषयी पोलिसांनी असा प्रकार केला असल्यास याविषयी त्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून अन्वेषण होऊन कारवाई व्हायला हवी !

(म्हणे) ‘डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचीही नावे संतांच्या सूचीत जोडता येतील; कारण त्यांनी सत्याचा अंत पाहिला !’

संतांनी जगण्याचे मर्म सांगितले. जे सत्याचा अंत पाहतात, ते खरे संत आहेत.असे केल्यास डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचीही नावे संतांच्या सूचीत जोडता येतील; कारण त्यांनी सत्याचा अंत पाहिला.

अ.भा. मराठी साहित्य संमेलनात राजकीय नेत्यांना व्यासपिठावर स्थान नाही

येथे झालेल्या ९३ व्या मराठी साहित्य संमेलन अराजकीय करण्यासाठी व्यासपिठावर कोणत्याही राजकीय नेत्याला स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील एकही आमदार, खासदार, तसेच शहराचे प्रथम नागरिक तथा नगराध्यक्ष संमेलनाला अनुपस्थित राहिले……….

खानापूर (कर्नाटक) येथे होणार्‍या मराठी साहित्य संमेलनाला महाराष्ट्रातून जाणार्‍या साहित्यिकांना बेळगावमध्येच थांबवले

कर्नाटकातील खानापूर तालुक्यातील इदलहोड येथे ‘गुंफण मराठी साहित्य संमेलन’ होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून साहित्यिक जाणार होते; मात्र पोलिसांनी त्यांना बेळगावमध्येच थांबवले…..

धाराशिव येथील संत गोरोबाकाका साहित्य नगरीमध्ये मराठी साहित्य संमेलनाचा समारोप

येथील संत गोरोबाकाका साहित्य नगरी येथे १० जानेवारीपासून चालू झालेल्या ३ दिवसीय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप १२ जानेवारी या दिवशी करण्यात आला. समारोप प्रसंगी एकूण २० ठरावांचे वाचन करण्यात आले; मात्र अनेक मराठीप्रेमी आणि सावरकरप्रेमी यांची मागणी असलेला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अवमानाच्या निषेधाचा ठराव करण्यात आला नाही.

दिब्रिटो यांचा देखावा !

स्वतःला साहित्याच्या मंदिरातील सेवक म्हणवून घेतांना दिब्रिटो यांनी त्यांच्या ५६ पानी भाषणात मराठी साहित्याचे उत्थान होण्यासाठी ते कोणते प्रयत्न करणार, संमेलनाच्या वर्षभरातील कार्याची दिशा काय असणार, याचा नामोल्लेखही केला नाही, हे मराठी सारस्वतांचे दुर्दैव आहे.

हिंदूंच्या देवता आणि धर्म यांवर साहित्य संमेलनात टीका नको ! – आनंद हर्डीकर, राजहंस प्रकाशन

हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर साहित्य संमेलनातून टीका न होण्याचे आवाहन करणारे ज्येष्ठ संपादक तथा राजहंस प्रकाशन संस्थेचे श्री. आनंद हर्डीकर यांचे अभिनंदन ! अशा प्रकारे सर्वत्रच्या हिंदूंनी जागरूक राहून आरंभापासूनच आवाहन केले, तर साहित्य संमेलनात हिंदूंच्या देवता आणि धर्म यांवरील टीका टळू शकेल !

संमेलन कि सोपस्कार ?

जेव्हा करण्यासारखे पुष्कळ असते, तेवढी क्षमताही असते; मात्र प्रत्यक्षात भरीव असे काहीच केले जात नाही, उलट पुष्कळ काही केल्याचा आव आणला जातो, तेव्हा विषयाचा गाभा उपेक्षित राहतो.

धाराशिव येथे आजपासून ९३ व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’ला प्रारंभ

येथे संत गोरोबाकाका साहित्य नगरीत ९३ व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’ला १० जानेवारीपासून प्रारंभ होत आहे.

१०, ११ आणि १२ जानेवारी या कालावधीत धाराशिव येथे होणार्‍या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने…

‘वर्ष १९३५, १९७० ते अगदी १९७५ पर्यंत होणार्‍या मराठी साहित्य संमेलनांत मराठी माणूस आणि मराठी भाषा हाच केंद्रबिंदू होता. हा केंद्रबिंदूच सध्या भरकटला आहे. संमेलनांमधून जे विचारमंथन व्हायला हवे, ते सध्या होत नाही.