नागपूर – येथे ‘महावितरण’च्या महिला कर्मचार्यासह इतर कर्मचार्यांवर आक्रमण केल्याप्रकरणी पोलिसांनी महंमद असद अब्दुल वाहाब कुरैशी याच्या विरोधात कपिलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. महावितरणच्या शारदानगर शाखेतील मुख्य यंत्र चालक सत्यभामा कृष्णाजी वानखेडे, या बाह्य स्रोत कर्मचारी धीरज वानखेडे यांच्यासह १२ सहस्र रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी कुरैशी यांच्या घरी गेल्या होत्या. या वेळी कुरैशी यांनी त्यांच्याशी वाद घालून त्यांच्यासह कर्मचार्यांसमवेत धक्काबुक्की आणि त्यांना मारहाण केली.
ही घटना रस्त्यावरच घडली. कुरैशी याने ‘पुन्हा या भागात दिसल्यास जिवे मारीन’, अशी धमकी देऊन तो पळून गेला. सत्यभामा वानखेडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कुरैशीविरुद्ध शासकीय कामात अडथळा, अश्लील शिवीगाळ आणि जिवे मारण्याच्या धमकीचा गुन्हा नोंद केला आहे.
संपादकीय भूमिकाउद्दाम धर्मांध ! अशांवर कठोर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबायला हवे ! |