शिक्षणात माणुसकी न शिकवल्याचा परिणाम !

‘शाळेपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत कोणत्याही शिक्षणात माणुसकी न शिकवल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात जनतेला लुबाडणारे व्यावसायिक आणि नोकरदार निर्माण झाले आहेत.’

हिंदूंनो, साधनेस आरंभ करा !

‘आपल्याला देवाचे साहाय्य का मिळत नाही ?’, याचा हिंदूंनी विचार केला पाहिजे आणि साहाय्य मिळण्यासाठी साधनेला आरंभ केला पाहिजे.’

यज्ञाचे महत्व !

‘मनुष्याच्या शरिरात जंतू असले, तर ते शरिरात घेतलेल्या औषधामुळे मरतात. त्याचप्रमाणे वातावरणातील नकारात्मक रज-तम हे यज्ञातील स्थूल आणि सूक्ष्म धुरामुळे नष्ट होतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

अमृत आणि विष

अमृत प्यायलेल्यालासुद्धा ‘जहर’ म्हणजे विष घेतले, तर ‘आपण मरू कि काय’, अशी भीती वाटू शकते; मात्र ज्याने विषच पचविलेले आहे, त्याला कशाचीच भीती नसते. सुखात राहिलेल्या साधकाला दुःखाची भीती वाटू शकते; मात्र सर्व संकटांतून गेलेल्याला कशाचीच भीती वाटत नाही.

साधना करण्याची अत्यावश्यकता !

‘अडचणीच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून आपण अधिकोषात (बँकेत) पैसे ठेवतो. त्याचप्रमाणे संकटाच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून साधनेचा साठा आपल्या संग्रहात असणे आवश्यक आहे. त्यामुळे संकटसमयी आपल्याला साहाय्य होते.’

पृथ्वीवरील ‘ॐ’कारस्वरूप असलेला रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम !

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम हा देवलोकासारखा आहे. आम्ही सप्तर्षी नेहमी या आश्रमाकडे ‘ॐ’कार आश्रम’ म्हणूनच बघतो. एक दिवस येणार, जेव्हा रामनाथी आश्रमात गुरुदेवांच्या खोलीवर आकाशात ‘ॐ’ दिसेल.’

विज्ञान हे कधी समजून घेईल ?

‘गणित आणि भूगोल हे निराळे विषय आहेत. एकाच्या भाषेत दुसरा विषय सांगता येत नाही. त्याचप्रमाणे ‘विज्ञान आणि अध्यात्म हे निराळे विषय आहेत’, हे विज्ञानाने समजून घेणे आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची साधनाविषयक अमृतवचने

‘गुरुदेवांनी आपल्याला शिकण्याच्या स्थितीत राहून आनंदी रहाण्याचा मार्ग शिकवला आहे. तो आपण सातत्याने आचरणात आणायला हवा !’

विज्ञानाची मर्यादा !

‘विज्ञानाने अध्यात्मातील सिद्धांतांविषयी काही सांगणे, म्हणजे बालकाने मोठ्यांविषयी काही सांगणे !’