गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशित केलेल्या चारही स्मरणिकांमध्ये साधकांच्या सेवाभावामुळे त्यातून सर्वाधिक चांगली स्पंदने प्रक्षेपित होणे

‘सत्त्वप्रधान वस्तू आणि घटक यांमध्ये देवतांचे तत्त्व आकृष्ट होत असते. प्रत्येक कृती (सेवा) ‘सत्यं शिवं सुन्दरम् ।’ केल्यास त्या कृतीत सत्त्वप्रधान स्पंदने येतात; कारण त्या कृतीत इष्ट देवतेचे तत्त्व आकृष्ट होते. वर्ष २०१९ मध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त सनातन संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या ४ स्मरणिकांच्या संदर्भात हे अनुभवायला मिळाले.

गुरुपौर्णिमा २०१९ स्मरणिकेविषयी घेण्यात आलेला सूक्ष्मातील प्रयोग

‘गुरुपौर्णिमा २०१९ मध्ये ४ स्मरणिका प्रकाशित केल्या. रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात त्यांचे प्रयोग घेण्यात आले. या ४ ही स्मरणिका ‘आत काय आहे’, हे दिसणार नाही, अशा पद्धतीने कागदामध्ये गुंडाळून त्यावर १, २, ३, ४ असे क्रमांक लिहिले आणि साधकांना ‘त्या हातात घेऊन काय वाटते’, असा प्रयोग करण्यास सांगितले.

इंदूर येथे ५ जुलै या दिवशी श्री गुरुपौर्णिमा ई-महोत्सव आणि ७ जुलै या दिवशी प.पू. भक्तराज महाराज जन्मशताब्दी सांगता उत्सव यांचे निमंत्रण

श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवं पारमार्थिक सेवा ट्रस्टच्या वतीने उत्सव

साधनेची आवड असणारी पुणे येथील बालसाधिका कु. तनया चंद्रहास म्हसकर (वय ९ वर्षे) हिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित

साधनेची आवड असणारी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेली बालसाधिका कु. तनया म्हसकर (वय ९ वर्षे) हिने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे २ जुलै या दिवशी ‘ऑनलाईन’ सत्संगात घोषित करण्यात आले.

श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीने श्री भवानीदेवीच्या मूर्तीतील ‘देवीतत्त्व’ जागृत केल्याने श्री भवानीदेवीच्या मूर्तीतील सकारात्मक ऊर्जेत (चैतन्यात) पुष्कळ वाढ होणे

‘वर्ष २०१४ पासून रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात श्री भवानीदेवीची सुंदर मूर्ती ठेवण्यात आली आहे. ध्यानमंदिरातील देवीच्या मूर्तीसमोर बसून साधक नामजपादी उपाय करतात.

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने श्री भवानीदेवीच्या मूर्तीच्या संदर्भात करण्यात आलेले वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

वर्ष २०१४ पासून रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात श्री भवानीदेवीची सुंदर मूर्ती ठेवण्यात आली आहे. नोव्हेंबर २०१९ पासूनचा मूर्तीसंदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण घटनाक्रम आणि ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी.

‘पांडुरंगाष्टकम्’ – श्रीमद् आद्यशंकराचार्यविरचित विठ्ठलस्तवन

आद्यशंकराचार्यांना पांडुरंगाने प्रत्यक्ष दर्शन दिले. त्यांना पांडुरंगामध्येे श्रीकृष्णाचे दर्शन झाले. पांडुरंगाच्या स्वरूपसंधानातून त्यांच्या दिव्य वाणीतून पांडुरंगाचे जे स्तुतीकवन गायले गेले, तेच हे ‘पांडुरंगाष्टकम् स्तोत्र’ होय.

आषाढी एकादशी – पंढरपूरला होणारा भागवतभक्तांचा महासंगम

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्यांच्या समवेतच्या महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या साधक गटाने एका पंढरीच्या वारीचे आणि त्यात होणार्‍या रिंगणाचे चित्रीकरण केले. त्याची माहिती येथे पाहूया !

ठाणे येथील श्रीमती माधवी नवरंगे (वय ७४ वर्षे), तसेच डोंबिवली येथील बालसाधिका कु. निर्मयी मांजरेकर (वय १ वर्ष) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी

देवता, परात्पर गुरु डॉक्टर आणि संत यांच्याप्रती भाव अन् अंगभूत साधकत्व असलेल्या ठाणे येथील श्रीमती माधवी शरद नवरंगे आणि डोंबिवली येथील चि. निर्मयी मंदार मांजरेकर या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्या आहेत.

ठाणे येथील कु. ईशान कौसडीकर (वय ७ वर्षे) याने गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी

सनातन संस्थेच्या वतीने चालू असलेला ‘ऑनलाईन बालसंस्कारवर्ग’ नियमित बघणारा आणि त्याप्रमाणे कृती करणारा ठाणे येथील कु. ईशान अरविंद कौसडीकर (वय ७ वर्षे) याने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असून तो जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाला आहे.