साधकांनो, दास्यभावाचे प्रतीक असलेल्या रामभक्त हनुमानाप्रमाणे अंतरात सेवकभाव निर्माण करून स्वतःतील अहंचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न करा !

साधकहो, प्रभु श्रीरामचंद्रांच्या रामराज्य स्थापनेच्या कार्याशी पूर्णतः एकरूप झालेल्या हनुमंताचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवा आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात स्वतःला समर्पित करा !’

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात बांधकाम सेवांच्या अंतर्गत सुतारकामाचे कौशल्य असलेल्या कारागिरांची आवश्यकता !

आश्रमात रहाणाऱ्या साधकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, सध्या नवीन वास्तूचे बांधकाम करण्याची सेवा चालू आहे. या वास्तू उभारणीच्या कार्यासाठी सुतारकामाचे कौशल्य असलेल्या कारागिरांची आवश्यकता आहे.

२५.५.२०२२ या दिवसापर्यंत सर्व संगणकांची स्वच्छता करावी !

संगणकांमध्ये धूळ साचली असल्यास त्यांच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो, तसेच मोठ्या प्रमाणावर अनिष्ट शक्तींचे अडथळे येतात. हे टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वी संगणकांची स्वच्छता करणे आवश्यक असते.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात धान्य निवडण्याच्या सेवेसाठी साधकांची आवश्यकता !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या चैतन्यदायी आश्रमात सेवेची अमूल्य संधी !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात धान्य निवडण्याच्या सेवेसाठी साधकांची आवश्यकता !

रामनाथी (गोवा) सनातनच्या आश्रमातील साधकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून स्वयंपाकघरातील विविध सेवांसाठी साधकसंख्या अपुरी पडत आहे. ‘दिवसभरात ६ – ७ घंटे बसून धान्य निवडू शकतील’, अशी शारीरिक क्षमता असलेले आणि ‘धान्यातील खडे किंवा अन्य कचरा पाहू शकतील’, अशा साधकांची आवश्यकता आहे.

‘गुरुकृपायोगा’नुसार साधनेमधील पहिला टप्पा केवळ ‘स्वभावदोष-निर्मूलन’ नसून ‘स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन’ असा आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधकांनीही स्वभावदोष-निर्मूलनासह गुण-संवर्धन प्रक्रियाही नियमित राबवावी; कारण गुण असल्याविना साधना करता येत नाही. गुणांमुळे मनोबल वाढते. गुणवृद्धी झाली की, ‘साधना करूनही प्रगती का होत नाही’, अशा प्रकारचे विचार किंवा या विचारांनी येणारी निराशाही येत नाही.