भारत उत्पादनात, तर पाकिस्तान मधुमेहाच्या आजारात जगात अव्वल !

पाकिस्तानातील प्रसिद्ध पत्रकार वजाहत खान यांनी ट्वीट करत ‘भारत उत्पादनाविषयी जगात प्रथम क्रमांकावर असतांना, पाकिस्तान मात्र मधुमेहाच्या आजाराच्या सूचीमध्ये जगात अव्वल आहे’, असे म्हटले आहे.

देहलीतील पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील शाळा बंद !

भारताशी युद्ध करून त्यावर नियंत्रण मिळवण्याचे स्वप्न पहाणार्‍या पाकची ही स्थिती लवकरच तो देशोधडीला लागणार आहे, याचेच दर्शक आहे !

आय.एस्.आय.च्या माजी प्रमुखाने घेतली होती ५०० कोटी रुपयांची लाच ! – माजी मंत्र्याचा आरोप

माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे मित्र असणारे आय.एस्.आय.चे माजी प्रमुख जनरल फैज हमीद यांनी ‘अल् कादीर ट्रस्ट’ घोटाळ्याच्या प्रकरणात ५०० कोटी रुपयांची लाच घेतली होती, असा आरोप माजी मंत्री फैजल वबडा आणि त्याचा मित्र यांनी केला.

चीनमध्ये १३ व्या शतकातील मशिदीचे नवीन बांधकाम पाडण्याला स्थानिक मुसलमानांचा विरोध

चीनमधील यूनान प्रांतातील नागू भागातील नाजियिंग मशिदीचे घुमट पाडण्याला स्थानिक मुसलमानांनी विरोध केला. गेल्या आठवड्यात चीनच्या पोलिसांनी मशिदीत घुसण्याचा प्रयत्न केल्यावर त्याला स्थानिक मुसलमानांकडून विरोध करण्यात आला.

पाकमध्ये ५५ वर्षीय मुसलमानाने ९ वर्षीय हिंदु मुलीचे धर्मांतर करून केला विवाह !

हिंदू कुठेही बहुसंख्यांक असोत अथवा अल्पसंख्यांक, त्यांच्या स्त्रिया अन् मुली या धर्मांध मुसलमानांच्या बळी ठरतात. ही स्थिती हिंदूंना लज्जास्पद !

सॅनफ्रॅन्सिस्को (अमेरिका) येथे राहुल गांधी यांच्या कार्यक्रमात खालिस्तानची मागणी !

यावरून काँग्रेस आणि खलिस्तानी यांचे साटेलोटे असल्याचा आरोप कुणी केल्यास त्यात चुकीचे काय ?

खलिस्तानसाठी जनमत संग्रह घेणारा कार्यक्रम ऑस्ट्रेलिया सरकारकडून रहित !

भारताशी संबंध सुदृढ होण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या ऑस्ट्रेलियाला तेथील भारतविरोधी शक्तींचा नायनाट करण्यासाठी आता कटीबद्ध व्हावे, असे भारताने त्याला सांगणे आवश्यक !

अहिंसेद्वारेच भारत आणि पाक यांच्यातील संबंध सुधारतील ! – जैन मुनी

लाहोरमधील जैन मंदिराच्या पुनर्बांधणीविषयी धर्मधुरंधर सुरी महाराज यांनी अप्रसन्नता व्यक्त केली. नवीन मंदिर किमान जैन मंदिरासारखे दिसायला हवे, असे ते म्हणाले.

पाकिस्तानला भाडेतत्वावर दिलेले विमान मलेशियाकडून जप्त !

आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असणर्‍या पाकला त्याचा मुसलमान मित्र देश मलेशियाने झटका दिला आहे. मलेशियाने पाकच्या सरकारी विमान वाहतूक आस्थापनाचे ‘बोईंग ७७७ ’हे विमान जप्त केले. पाकिस्तानने मलेशियाचे कर्जाचे पैसे करत न केल्याने मलेशियाने ही कारवाई केली आहे.

पाकिस्तानच्या कारागृहातील भारतीय मासेमार्‍याचा मृत्यू

जागतिक मानवाधिकार संघटना याकडे लक्ष देत नाहीत, हे लक्षात घ्या !