मध्यप्रदेशमधील काँग्रेस सरकारने एका महाविद्यालयातील पुस्तकातून कारगिल युद्धावरील धडा वगळला !

मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकारने महाविद्यालयातील अभ्यासक्रमातील पुस्तकातून कारगिल युद्धाचा धडा वगळला आहे. 

‘एम्.ए. भाग-१ च्या इतिहासा’च्या पुस्तकात मोहनदास गांधी यांचे नाव आणि जन्मवर्ष चुकीचे प्रसिद्ध

मुंबई विद्यापिठाच्या दूरस्थ आणि मुक्त अध्ययन केंद्राने ‘एम्.ए. भाग-१ च्या इतिहासा’च्या पुस्तकात मोहनदास गांधी यांचे नाव ‘मोहन’ आणि त्यांचे जन्मवर्ष २ ऑक्टोबर १८६९ ऐवजी २ ऑक्टोबर १९६९ असल्याचे चुकीचे प्रसिद्ध केले आहे.

(म्हणे) ‘बाबरी मशीद पाडली, तेव्हा भगवान रामालाही दु:ख झाले असेल !’- अभिनेत्री शबाना आझमी

बाबरीच्या ठिकाणी राममंदिर होते आणि ते पाडून तेथे बाबरी मशीद बांधण्यात आली होती, हे अलाहाबाद उच्च न्यायालयानेही मान्य केले आहे, हे शबाना आझमी का सांगत नाहीत ?  भारतात मुसलमान आक्रमकांनी शेकडो मंदिरे पाडून मशिदी बांधल्या. त्या वेळी ‘अल्लाला काय वाटले असेल ?’, याचे उत्तर शबाना आझमी का देत नाहीत ?

(म्हणे) ‘सावरकर हे सर्वांत मोठे फॅसिस्ट !’ – भालचंद्र मुणगेकर

गेल्या ५ वर्षांत जी सत्ता आली आणि त्यानंतर जी काही संस्कृती आणि उग्रवाद आला, तो फॅसिस्ट विचारधारेचा आहे. सावरकर हे सर्वांत मोठे फॅसिस्ट होते, असे प्रतिपादन मुंबई विद्यापिठाचे माजी कुलगुरु भालचंद्र मुणगेकर यांनी केले.

काश्मीरचा इतिहास शाळांमधून शिकवा ! – प्रशांत तळणीकर

आजपर्यंत शाळांमध्ये काश्मीरचा इतिहास कधीही शिकवला गेलेला नाही. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, असे प्रतिपादन श्री. प्रशांत तळणीकर यांनी केले.

शल्यचिकित्सा शास्त्राचे पितामह म्हणून ओळखले जाणारे ‘सुश्रुत’ यांचा ‘पशूवैद्यक’ असा उल्लेख !

पाठ्यपुस्तक मंडळाचा भोंगळ कारभार आणि अज्ञान उघड ! ‘सुश्रुत’ यांची शल्यचिकित्सा हा याच प्राचीन सनातन हिंदु संस्कृतीचा एक अत्यंत अभिमानास्पद वारसा आहे. असे असतांना त्यांचा उल्लेख पशूवैद्यक म्हणून करून पाठ्यपुस्तक मंडळाने त्यांचा अवमानच केला आहे. 

(म्हणे) ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी प्रथम द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला आणि महंमद अली जिनांनी तो पूर्ण केला !’

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अखंड भारताचे स्वप्न पाहिले ! याउलट मोहनदास गांधी आणि काँग्रेसी यांनी जिनांसमोर गुडघे टेकून भारताच्या फाळणीला मान्यता दिली. त्यामुळे द्विराष्ट्रवादाला कोणी खतपाणी घातले, हे जनता जाणून आहे !

सावरकर ने ही प्रथम हिन्दू और मुसलमान राष्ट्र की बात की थी ! – छत्तीसगढ के कांग्रेसी मुख्यमंत्री भूपेश बघेल

नहीं, सावरकर ने अखंड हिन्दू राष्ट्र की बात की थी !

काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा सावरकरद्वेष जाणा !

‘सावरकर यांनी धर्माच्या आधारे हिंदु आणि मुसलमान राष्ट्र यांची कल्पना मांडली आणि ते पूर्ण करण्याचे काम महंमद अली जिना यांनी केले’, असे विधान छत्तीसगडमधील काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केले.

तक्रार करून घेण्यास टाळाटाळ करणारे निष्क्रीय पोलीस !

‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झाँसी’ या चित्रपटाच्या विरोधात विवेक तांबे यांनी उल्हासनगरच्या पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार केली होती; मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास असमर्थता दर्शवली. तांबे हे राणी लक्ष्मीबाई यांच्या वारसांपैकी एक आहेत.


Multi Language |Offline reading | PDF