देवद आश्रमातील श्री. दीपक परब यांच्या पत्नीला जाणवलेली त्यांची वैशिष्ट्ये !

ते साधकांच्या बॅगा आणि इतर साहित्य त्यांच्या खोलीपर्यंत नेऊन देतात. एकदा मी त्यांना म्हणाले, ‘‘तुम्ही या सेवा का करता ?’’ तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘आपण नेहमी ‘दासों के दास’ झाले पाहिजे. ते गुरुदेवांना अधिक आवडेल. परात्पर गुरुदेवांना साधक अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे साधकांची सेवा केली, तर देवाला ते अधिक आवडेल.’’

हसतमुख, प्रेमळ, साहाय्यास सदैव तत्पर असणारे आणि गुरुदेवांवर पुष्कळ श्रद्धा असणारे श्री. दीपक परब !

‘अत्यल्प अहं, भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवेचा ध्यास, इतरांचा विचार करणे, कुठलीही सेवा करण्यास सिद्ध असणे, सदैव आनंदी आणि सकारात्मक असणे, कुणाविषयी मनात विकल्प नसणे, स्वीकारण्याची अन् शिकण्याची वृत्ती आणि ‘दिसेल ते कर्तव्य’ करण्यातील त्यांची तत्परता’, अशा अनेक गुणांचा समुच्चय असलेले दीपकदादा !

अपेक्षा

साधना करतांना फळाची अपेक्षा नको !, आणि पालकांनी लहान मुलांकडून साधनेची अधिक अपेक्षा करू नये. मुलांमध्ये साधनेची गोडी हळूहळू निर्माण करावी. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

मनमोकळे आणि निर्मळ असणारे श्री. दीपक परब यांची सौ. रेखा जाखोटिया यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

‘अतिशय मनमोकळे, साधे आणि निर्मळ’ असे श्री. दीपक परब यांचे व्यक्तीमत्त्व आहे. साधकांना साहाय्य करण्याचा विशेष गुण त्यांच्यात आहे. ते प्रत्येक सेवा भावपूर्ण करतात आणि त्यांच्यात अहं अल्प असल्याचे जाणवते.

विविध कार्यक्रमांत विषय मांडतांना आपले बोलणे आध्यात्मिकदृष्ट्या प्रभावी होऊन ते उपस्थितांच्या अंतर्मनात जाण्यासाठी स्वतःचे साधनाबळ वाढवा !

कार्यकर्त्यांनी व्यष्टी साधनेसाठी सातत्याने आणि तळमळीने प्रयत्न केले, तरच त्यांच्या वाणीत चैतन्य निर्माण होईल. त्या चैतन्यमय वाणीमुळे भाषणातील विषय धर्मप्रेमींच्या अंतर्मनापर्यंत तर पोचेलच; पण त्यासह ते धर्मरक्षण आणि धर्मजागृती यांसाठीही उद्युक्त होतील, यात शंका नाही !

सिंधुदुर्ग येथील डॉ. रविकांत नारकर यांना धर्मप्रसार करतांना सनातन संस्थेच्या विश्‍वासार्हतेविषयी लक्षात आलेली सूत्रे

धर्मप्रसार करतांना सनातन संस्थेच्या विश्‍वासार्हतेविषयी लक्षात आलेली काही सूत्रे इथे प्रसिद्ध करीत आहोत.

श्री गुरुपादुका प्रतिष्ठापनेच्या वेळी अनुभवलेला परात्पर गुरु डॉक्टर यांच्यातील उच्चतम शिष्यभाव !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले सर्वोच्च अशा परात्पर गुरुपदावर विराजमान आहेत. महर्षींनी त्यांच्याविषयी ‘संपूर्ण जगात त्यांच्यासारखे गुरु नाहीत’, असे गौरवोद्गार काढले आहेत. असेे असूनही आपण नेहमीच ‘परात्पर गुरु डॉक्टर अखंड शिष्यावस्थेतच असतात’, हे अनुभवतो. १२.२.२०१९ या दिवशी भृगु महर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी येथील आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पादुकांचा प्रतिष्ठापना सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या वेळीही पुढील प्रसंगांतून त्यांचा उच्चतम शिष्यभाव दिसून आला.

हंगरहळ्ळी (कर्नाटक) येथील श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीच्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील वास्तव्यकाळात आश्रमात पार पडला आनंददायी सोहळा !

श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीचे सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात आगमन होण्यापूर्वी ६ नोव्हेंबरला पारपतीवाडा (बांदोडा) येथून तिची मिरवणूक काढण्यात आली होती.

देवीच्या कृपेची प्रचीती देणारे भावपूर्ण वातावरणात समुद्रकिनारी पार पडलेले श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीचे पूजन अन् समुद्रस्नान !

कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यातील हंगरहळ्ळी येथील श्री विद्याचौडेश्‍वरी देवीचे ६ आणि ७ नोव्हेंबर या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्य केले. ७ नोव्हेंबरला श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीचे समुद्रकिनारी पूजन अन् समुद्रस्नान आनंददायी आणि भावपूर्ण वातावरणात पार पडले.

अंगाला तेल लावून उन्हात बसल्याने होणारे लाभ

‘अंगाला तेल लावल्यावर ते त्वचेतून शरिरात शोषले जाते. अशा वेळी उन्हात बसल्याने त्वचेचे तापमान वाढते. यामुळे त्वचेचा रक्तप्रवाह वाढतो आणि तेल शरिरात चांगल्या प्रकारे शोषले जाण्यास साहाय्य होते….