देश दुर्दशेला जाण्यामागे हे आहे कारण !

‘सुखासाठीच्या सर्व गोष्टी शिकवणारे आई-वडील आणि सरकार मुलांना चांगले अन् सात्त्विक काहीच शिकवत नाहीत. त्यामुळे देश दुर्दशेच्या परिसीमेला पोचला आहे. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’

राजकीय पक्षांची दु:स्थिती जाणा !

‘हल्ली निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या उमेदवारांत चांगले उमेदवार अल्प प्रमाणात असल्याने मतदारांना त्यातल्यात्यात कमी वाईट उमेदवाराला मत द्यावे लागते !’

भगवंताचा भक्त होणे हेच श्रेयस्कर !

‘राजकीय पक्षाचे किंवा एखाद्या मोठ्या संघटनेचे पद मिळण्यापेक्षा भगवंताचा भक्त होणे चांगले !’

संशोधन न करणारे बुद्धीप्रामाण्यावादी कसे ?

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी कधी संशोधन करण्यासाठी उपकरणांचा वापर करून ‘अध्यात्मशास्त्र चुकीचे कसे आहे’, हे सिद्ध केले नाही; पण महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने ‘अध्यात्मशास्त्र चिरंतन सत्य सांगते’, हे शेकडो प्रयोग करून सिद्ध केले आहे आणि अनेक राष्ट्रीय अन् आंतरराष्ट्रीय परिषदांत शोधप्रबंध सादर केले आहेत.’

ईश्वरी कायदे आणि जमाखर्च यांचे महत्त्व !

‘पृथ्वीवरील कायदे आणि जमाखर्च इत्यादी सर्व व्यर्थ आहेत. शेवटी प्रत्येकाला ईश्वरी कायदे आणि जमाखर्च इत्यादींना सामोरे जावे लागते.’

बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा हिंदुद्रोह !

‘काही पंथीय पैसे देऊन किंवा धमकावून इतरांना आपल्या पंथात खेचतात. याउलट हिंदु धर्मात येतात ते त्यातील अद्वितीय शिकवणीमुळे ! असे असले, तरी बुद्धीप्रामाण्यवादी हिंदु धर्माच्या शिकवणीला चुकीचे म्हणतात !’

धर्मांधांनी केलेली राष्ट्रहानी आणि त्याकडे झालेले दुर्लक्ष !

‘धर्मांधांमध्ये राष्ट्रप्रेमापेक्षा धर्मप्रेम अधिक असल्यामुळे ते धर्मासाठी कधीही आणि कितीही राष्ट्रहानी करतील’, हे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनकर्त्यांच्या आणि बहुसंख्य हिंदूंच्या लक्षात आले नाही’, हे त्यांना लज्जास्पद आहे !’

ब्राह्मणद्वेष्ट्यांचे हे पाप !

‘आजोबा, पणजोबा यांनी गुन्हा केला, तर नातवंडे, पतवंडे यांना शिक्षा करत नाहीत; मात्र काही ब्राह्मणद्वेष्टे काही पिढ्यांपूर्वी काही ब्राह्मणांनी केलेल्या कथित अपराधांची शिक्षा सर्वच ब्राह्मणांना करत आहेत. हे पाप होय !’

बुद्धीप्रामाण्यवाद्यांना हे मूल्य मोजावे लागणार !

‘जे बुद्धीप्रामाण्यवादी ‘देव नाही’ म्हणतात, त्यांना भक्तांना येते, तशी चिरंतन आनंदाची अनुभूती कधी येईल का ?’

बुद्धीच्या स्तरावरील विज्ञान अन्‌ बुद्धीपलीकडील अध्यात्म !

‘विज्ञान अनेक वर्षे एखाद्या गोष्टीचे बुद्धीने स्थुलातील कारण शोधते. याचे कारण हे की, कारण कळल्याशिवाय त्याला उपाय कळत नाही, तर अध्यात्म त्यामागील बुद्धीपलीकडील सूक्ष्मातील शास्त्र आणि उपाय तात्काळ सांगते.’