परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !
बीड जिल्ह्यातील परळी येथील वैद्यनाथ विद्यालयात गेल्या महिनाभरापासून नियमित अध्यापन पूर्णपणे बंद असल्याने संतापलेल्या विद्यार्थ्यांनी १६ जुलै या दिवशी शाळेच्या मैदानात उतरून ‘आम्हाला शिक्षण द्या, आमचे तास घ्या’, अशी घोषणा देत आंदोलन केले.