बांगलादेशामध्ये ७ आतंकवाद्यांना न्यायालयाने सुनावली मृत्यूदंडाची शिक्षा

आतंकवादविरोधी विशेष न्यायालयाने जुलै २०१६ मध्ये ढाक्यातील ‘होली आर्टिसन बेकरी’ या उपहारगृहावर आक्रमण करणार्‍या ७ आतंकवाद्यांना २७ नोव्हेंबरला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. या घटनेत तारुषी जैन या भारतीय तरुणीसह २० विदेशी नागरिकांचा मृत्यू, तर अन्य ३० जण घायाळ झाले होते.