कोरोनाच्या संसर्गामुळे फेरीवाल्यांना व्यवसायासाठी अनुमती नाही ! – राज्य सरकार

राज्य सरकारने फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास अनुमती द्यावी, याविषयी सरकारला निर्देश देण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे करण्यात आली आहे. त्यावर राज्य सरकारने अशी भूमिका उच्च न्यायालयात मांडली.

गोव्यात ८ जुलैला १३६ कोरोनाबाधित सापडले

गोव्यात ८ जुलैला १३६ कोरोनाबाधित रुग्ण सापडले, तर ५१ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत राज्यात ८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर सक्रीय कोरोनाबाधितांची संख्या ८२४ झाली आहेे. आतापर्यंतची एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ सहस्र ३९ झाली आहे.

देवदर्शनासाठी मंदिरे उघडा ! – सुभाष प्रियोळकर, सामाजिक कार्यकर्ते

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर लागू असलेल्या दळणवळण बंदीमुळे बंद ठेवण्यात आलेली सर्व मंदिरे देवदर्शनासाठी उघडावी, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. सुभाष प्रियोळकर यांनी केली आहे.

फोंडा तालुक्यातील बोरी गावात ८ जुलैपासून ग्रामस्थांची स्वयंस्फूर्तीने दळणवळण बंदी

फोंडा तालुक्यातील बोरी गावात कोरोनाचे ४-५ रुग्ण सापडल्याने ८ जुलैपासून ग्रामस्थ आणि पंचायत यांच्या पुढाकाराने या भागात दळणवळण बंदी घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे ८ जुलैला बोरी गावातील सर्व दुकाने बंद होती.

८ जुलैनंतर रत्नागिरी जिल्ह्यात येण्यासाठी ई-पास आवश्यक ! – अविषकुमार सोनोने, उपविभागीय अधिकारी, खेड

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी (ऑपरेशन ब्रेक द चेन) सध्या रत्नागिरी जिल्ह्यात अभियान चालू आहे. यामुळे चालू असलेली दळणवळण बंदी नंतर शिथिल करण्यात येईल; मात्र ८ जुलैनंतरही रत्नागिरी जिल्ह्यात येण्यासाठी ई-पास आवश्यक आहे

कोरोनासंबंधी जागृती करण्यासाठी संबंधित मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली तालुकावार बैठकांना प्रारंभ

राज्यातील अनेक मंत्री आणि आमदार यांनी कोरोनाविषयी जनमानसात जागृती करण्यासाठी तालुकावार बैठकांना प्रारंभ केला आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे कठोरतेने सर्वत्र पालन होण्याच्या दृष्टीने या बैठकांमध्ये प्रयत्न केले जात आहेत.

राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी

दळणवळण बंदी नियमांचे उल्लंघन करणार्‍यांच्या विरोधात पोलिसांनी कठोरतेने वागणे आवश्यक आहे, असा आदेश पोलिसांना दिल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. पर्वरी येथील सचिवालयात झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते.

रत्नागिरीत नवीन ३१ रुग्णांमुळे कोरोनाबाधितांची संख्या ७८१

जिल्ह्यात आणखी ३१ नवीन कोरोना रुग्णांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७८१ झाली आहे. यामध्ये रत्नागिरी तालुक्यात १२ रुग्ण सापडले असून त्यामध्ये जिल्हा रुग्णालयातील एका कर्मचार्‍याचा समावेश आहे.

शासनामध्ये कुरघोडीचे राजकारण चालू आहे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते

‘देशात सर्वाधिक चाचण्या करण्याची क्षमता महाराष्ट्र्रात आहे; पण राज्य सरकारकडून चाचण्या केल्या जात नाही. महाराष्ट्रात मात्र मुंबई आणि महानगर क्षेत्रांतील रुग्णसंख्या न्यून दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून भविष्यात लोकांचा जीव धोक्यात टाकला जात आहे’, असा आरोप फडणवीस यांनी केला.

पुणे महापालिकेच्या २०० कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण

महापौरांपाठोपाठ आता पालिकेतील २०० कर्मचारी आणि काही नगरसेवक यांना कोरोनाची लागण झाली आहे. २ खासदार आणि ४ आमदार यांनी स्वतःला क्वारंटाईन केले आहे.