३ वर्षांच्या मुलीची हत्या करून धर्मांधाने मृतदेह बॅगेत लपवला !

तळोजा (जिल्हा रायगड) येथील घटना !

प्रतिकात्मक चित्र

तळोजा (जिल्हा रायगड) – नवी मुंबईतील देवीचा पाडा येथून स्वतःची ३ वर्षांच्या मुलीच्या अपहरणाची तक्रार तिचे वडील अमरीश शर्मा यांनी प्रविष्ट केली होती. पोलिसांच्या अन्वेषणात शेजारील महंमद अन्सारी (वय २९ वर्षे) याने तिची हत्या करून तिच्या घरात कुणीही नसतांना स्नानगृहाच्या छतावर तिचा मृतदेह बॅगेत लपवून ठेवल्याचे उघडकीस आले. धर्मांध आरोपीची पत्नी आणि मुलीची आई यांच्यात कायम वाद होत असत. महंमद एका ऑनलाईन खेळामध्ये ४२ सहस्र रुपये हरला. त्यामुळे त्याने मुलीचे अपहरण करून तिला मारून खंडणी मागण्याचा बनाव रचला होता; मात्र मुलीच्या पित्याच्या तक्रारीमुळे पोलिसांचा वावर वाढल्याने त्याचा तसे करण्याचा प्रयत्न फसला. शेवटी पोलिसांनी पकडल्यावर त्याने गुन्हा मान्य केला. (धर्मांधाने केवळ रागातून खंडणीसाठी मुलीचे अपहरण केले कि तिच्यावर लैंगिक अत्याचारही केले, याचीही विस्तृत माहिती पोलिसांनी जनतेला द्यायला हवी ! पोलिसांनी धर्मांधांचे खरे रूप उघड करायला हवे ! – संपादक) आरोपी अन्सारी याला तीन मुले आहेत.

संपादकीय भूमिका :

धर्मांधाचे क्रौर्य ! अशांना आजन्म कारागृहात डांबण्याची शिक्षा द्यायला हवी !