राज्यघटनेविषयी बोलणार्‍यांचा समान नागरी कायद्याला विरोध का ? – आमदार चित्रा वाघ, भाजप

एका देशात दोन कायदे देशाचे विभाजन करतात. राज्यघटनेविषयी बोलणार्‍यांचा समान नागरी कायद्याला विरोध का ? असा प्रश्न भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी विधान परिषदेत राज्यघटनेवरील चर्चेवरील भाषणामध्ये केला.

अहिल्यानगर येथे विवाहितेवर अत्याचार; २ धर्मांधांना अटक !

कायद्याचे भय नसणारे उद्दाम धर्मांध ! अशा धर्मांधांना कठोर शिक्षा लवकरात लवकर होणे आवश्यक !

औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांना मनुस्मृतीप्रमाणे मारलेले नाही !

औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांना मनुस्मृतीप्रमाणे मारले, याला कोणताही तार्किक किंवा समकालीन आधार नाही. कोणताही ऐतिहासिक आधार नाही. तर्काला व्याप्तीची आवश्यकता असते.

सातारा येथे भटक्या श्वानांचे २ मुलींवर आक्रमण

येथील सदरबाझार स्थित नवीन म्हाडा वसाहतीमध्ये भटक्या श्वानांनी २ मुलींवर आक्रमण केले. यामध्ये दोन्ही मुली घायाळ झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

पुणे पोलिसांनी पावणे आठ कोटींचे अमली पदार्थ नष्ट केले !

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात गेल्यावर्षी ९ पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या ५७ गुन्ह्यांमध्ये अमली पदार्थांचा ७ कोटी ७६ लाख रुपये (७८८ किलो) किंमतीचा साठा जप्त केला होता.

अमेरिकेने बांगलादेशातील अल्पसंख्यांकांवरील हिंसाचाराचा केला निषेध !

बांगलादेशातील सध्याचा हिंसाचार नुसत्या चेतावणीने थांबणारा नाही, तर बांगलादेशाच्या विरोधात आर्थिक निर्बंधासारखी कठोर पावले उचलणे अमेरिकेकडून अपेक्षित आहे !

व्यावसायिक वाहनांवरील सामाजिक संदेश मराठी भाषेत प्रदर्शित होणार ! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की, महाराष्ट्राची मराठी ही अधिकृत राज्यभाषा आहे. महाराष्ट्रातील नागरिक हे मराठी भाषिक आहेत. सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.

प्रत्येकी १ झाड तोडल्याच्या प्रकरणी १ लाख रुपयांचा दंड ! – सर्वाेच्च न्यायालय

दंड भरून अशांना सोडू नये, तर त्यांना कारागृहात शिक्षा भोगण्यास पाठवावे !

कामे वेळेत पूर्ण न करणार्‍या कंत्राटदाराचा काळ्या सूचीत समावेश ! – मंत्री गुलाबराव पाटील

बीड जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत १७७ योजना राबवल्या जात आहेत. या अंतर्गत गेवराई तालुक्यातील ४५ आणि माजलगाव तालुक्यातील २९ गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी निविदा प्रक्रियेनंतर मे. प्रगती कन्स्ट्रक्शन या आस्थापनाला कामे मान्य करण्यात आली आहेत.

कोणतीही करवाढ नसलेले कोल्हापूर महानगरपालिकेचे ७०६ कोटी रुपये जमेचे अंदाजपत्रक सादर !

घरपट्टी, पाणीपट्टी यांमध्ये कोणत्याही प्रकारची करवाढ नसलेले ७०६ कोटी ६४ लाख रुपये जमेचे कोल्हापूर महापालिकेचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले.