‘जय श्रीराम’ न बोलण्यावरून मारहाण करण्यात आल्याचा मौलवीचा आरोप खोटा ! – पोलीस

धर्मांध जाणीवपूर्वक त्यांना वैयक्तिक किंवा अन्य कोणत्याही कारणाने झालेल्या मारहाणीला धार्मिक रंग देऊन हिंदूंना अपकीर्त करून पुरो(अधो) गामी, निधर्मीवादी यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, हेच स्पष्ट होते !

(म्हणे) ‘गोरक्षण आणि धर्म यांच्या नावाखाली झुंडबळीच्या वाढत्या घटना देशासाठी चिंताजनक !’ – आदी गोदरेज, उद्योगपती

गोदरेज यांना जिहादी आतंकवाद, धर्मांधांकडून होणार्‍या गोहत्या, हिंदूंना ‘काफिर’ ठरवून केल्या जाणार्‍या हिंसक कारवाया, ‘लव्ह जिहाद’ करून हिंदु युवतींचे आयुष्य उद्ध्वस्त करणे, देवतांच्या मूर्तींची तोडफोड करणे आदी घटना देशासाठी चिंताजनक वाटत नाहीत का ?

अमर्त्य सेन यांनी अर्थशास्त्राकडेच लक्ष द्यावे !

‘रामराजा तला’ आणि ‘सेरामपोर’ हे बंगालमध्येच आहेत कि अन्य कुठे आहेत ? भूत-प्रेत यांच्यापासून स्वतःचे रक्षण होण्यासाठी आपण ‘राम राम’ असा जप करत नाही का ? अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रामुळे नोबेल पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी त्यांच्या विषयाकडेच लक्ष द्यावे. – मेघालयचे राज्यपाल तथागत रॉय

राहुल गांधी यांना जामीन संमत

गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात अब्रूहानीचा खटला प्रविष्ट करण्यात आला आहे.

(म्हणे) ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या आरोपावर मी ठाम आहे !’ –  राहुल गांधी

‘सुंभ जळाला, तरी पीळ जात नाही’, अशा वृत्तीचे राहुल गांधी ! तथ्यहीन आरोप करून हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न केल्यामुळेच जनतेने सत्तेवरून खाली खेचले आणि देशभरात दारुण पराभव झाला, तरीही काँग्रेसचे राहुल गांधी यांना अजून शहाणपण आले नाही, असेच म्हणावे लागेल !

आज राहुल गांधी यांच्यावरील अब्रूहानीच्या खटल्याची सुनावणी

गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप केल्याप्रकरणी राहुल गांधी आणि सीताराम येचुरी यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या अब्रूहानीच्या खटल्याची सुनावणी ४ जुलैला होणार आहे.

(म्हणे) ‘देवदर्शन करण्याऐवजी नालेस्वच्छता करून घेतली असती, तर मुंबई बुडाली नसती !’

मुंबई तुंबण्याचा संदर्भ देवदर्शनाशी जोडून अशोक चव्हाण यांचे हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान करणारे वक्तव्य ! देवदर्शनाला न्यून लेखणारे अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांविषयी असे बोलण्याचे धाडस दाखवू शकतील का ?

(म्हणे) ‘देशात मनुस्मृतीच्या समर्थकांची सत्ता आल्याने बहुजनांवर अत्याचार !’

सध्या बहुजनांच्या दृष्टीने प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. मनुस्मृतीच्या समर्थकांची सत्ता आली आहे. त्यामुळे बहुजनांवर अत्याचार होत आहेत, असा जावईशोध तथाकथित विचारवंत आणि लेखक डॉ. आ.ह. साळुंखे यांनी लावला.

(म्हणे) ‘भगव्या ‘जर्सी’मुळे (पोषाखामुळे) भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंडकडून पराभव !’ – मेहबूबा मुफ्ती यांचा थयथयाट

भारताच्या पराभवाचे नाही, तर भारताच्या पराभवामुळे पाकिस्तानला उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे, याचेच मेहबूबा मुफ्ती यांना अधिक दुःख झाल्याने त्या ते अशा प्रकारे व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे न समजायला हिंदू दूधखुळे नाहीत !

(म्हणे) ‘मी हिंदू आहे’, असे म्हणणार्‍याच्या तोंडावर ठोसे मारल्यावर त्याला सत्य काय ते कळेल !’

धर्मांध बिशप इझरा सर्गुणम यांची दर्पोक्ती ! सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्षता यांचा डांगोरा पिटणारे या विधानाविषयी तोंड उघडतील का ? ‘प्रेम आणि शांती यांचे पुजारी’ म्हणून ओळखले जाणारे पाद्री समाजात विष कालवण्याचा आणि समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न करतात, हे जाणा !


Multi Language |Offline reading | PDF