विदेशी नागरिकालाही भारतातील आंदोलनात सहभागी होण्याचा अधिकार ! – कोलकाता उच्च न्यायालय

भारतामध्ये रहाणार्‍या विदेशी नागरिकालाही भारतीय राज्यघटनेच्या कलम २१ अनुसार व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. विदेशी नागरिक या कलमाच्या अंतर्गत भारतातील आंदोलनात सहभागी होऊ शकतात, असा निर्णय कोलकाता न्यायालयाने दिला आहे.

कोलकात्याच्या मध्यवर्ती कारागृहात कोरोनाच्या भीतीमुळे झालेल्या हाणामारीमध्ये एका बंदीवानाचा मृत्यू

येथील डमडम मध्यवर्ती कारागृहामध्ये कोरोनाच्या भीतीमुळे बंदीवानांनी हाणामारी केली. संतापलेल्या बंदीवानांनी एका छोट्या चौकीला आगही लावली. या हाणामारीमध्ये एका बंदीवानाचा मृत्यू झाला, तर १२ हून अधिक बंदीवान घायाळ झाले.

बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या राजवटीत हिंदूंवर जिहादी संकट ! – डॉ. सचिंद्रनाथ सिंघ, राष्ट्रीय साहाय्यक सचिव, विहिंप

बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या राजवटीत हिंदूंवर जिहादी संकट ओढवले आहे. राज्य सरकारच्या भेदभाव करणार्‍या वृत्तीमुळे हिंदु समाजासाठी राज्यात अत्यंत धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे,

नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी म. गांधी यांनी जे सांगितले, त्याचे आम्ही पालन केले ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

देशाची फाळणी झाल्यामुळे पाकिस्तानमध्ये राहिलेल्या ज्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, धर्माच्या नावाखाली अत्याचार झाले, त्यांना भारताचे नागरिकत्व द्यायला हवे, असे म. गांधी आणि अन्य ज्येष्ठ नेते यांचे मत होते.

बंगालचे मंत्री सिद्दीकुल्ला चौधरी यांना बांगलादेशाने व्हिसा नाकारला

बंगालचे मंत्री सिद्दीकुल्ला चौधरी यांना बांगलादेशाने ६ दिवसांच्या दौर्‍यासाठी व्हिसा देण्यास नकार दिला आहे; मात्र त्याचे कुठलेही कारण देण्यात आले नाही, असे त्यांनी म्हटले आहे. ‘दोन्ही देशांचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे ही घटना दुर्दैवी आहे.