महाराष्ट्रात एक दिवस शिवसेनेचा मुख्यमंत्री आणणारच ! – उद्धव ठाकरे

‘शिवसेनाप्रमुखांचा मुलगा खोटे बोलत आहे’, असा खोटा ठरून मी महाराष्ट्रापुढे जाणार नाही. महाराष्ट्रात एक दिवस मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करणारच, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी ८ नोव्हेंबर या दिवशी शिवसेना भवन येथील पत्रकार परिषदेत केले.

मला युती तोडायची नाही, भाजपने निर्णय घ्यावा ! – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना

शिवसेनेची निर्मिती स्वाभिमानातून झाली आहे. केवळ भाजपची कोंडी करायची म्हणून हे सगळे करत नाही. जे ठरले तसे असेल, तर भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी दूरभाष करावा. मला ठरल्यापेक्षा एकही कण अधिक नको. मला स्वत:ला युती तोडायची नाही.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मंत्रालयापुढे दुधाच्या पिशव्या फोडून आंदोलन

प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी योजनेचा करार त्वरित रहित करावा, या मागणीसाठी ४ नोव्हेंबर या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुधाच्या पिशव्या फोडून मंत्रालयापुढे आंदोलन केले. या वेळी पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि कार्यकर्ते यांना कह्यात घेतले.

आम्ही मित्रपक्षाला शत्रू मानत नाही, लवकरच स्थिर शासन स्थापन करू ! – उद्धव ठाकरे

अमित शाह यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत जे ठरले ते करावे. आम्ही मित्रपक्षाला शत्रू मानत नाही. आम्ही लवकरच स्थिर शासन स्थापन करू, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी केले.