दाबोळी विमानतळाला सर्वोत्तम विमानतळ म्हणून मान्यता
गोव्याच्या विमान वाहतूक क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठतांना दाबोळी येथील गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रतिष्ठित ‘एसीआय-एएस्क्यू सर्वेक्षण २०२४’मध्ये ‘एएस्क्यू’ मानांकनाच्या आधारे भारतीय विमानतळ प्राधिकरणांतर्गत सर्वोत्तम विमानतळ म्हणून स्थान देण्यात आले आहे.