प.पू. आबा उपाध्ये यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव !

‘प.पू. आबा रामनाथी आश्रमात आले होते. त्या वेळी मलाही त्यांच्या समवेत आश्रमात येण्याची संधी मिळाली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘पाश्‍चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्‍वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हे गुरुमाऊली, आपल्या चरणी शतशः प्रणाम ।

सनातन संस्था संस्थापक । परात्पर गुरु डॉ. आठवले ।यांनी रचला नवा इतिहास । अशा युगपुरुषास ।
आम्हा साधकांचा त्रिवार प्रणाम खास ॥ १ ॥

चिरंतन आनंद प्राप्तीसाठी साधनेला पर्याय नाही !

‘देवावर आणि साधनेवर विश्‍वास नसला, तरी चिरंतन आनंद प्रत्येकालाच हवा असतो. तो केवळ साधनेने मिळतो. एकदा हे लक्षात आले की, साधनेला पर्याय नसल्याने मानव साधनेकडे वळतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘ईश्‍वरात स्वभावदोष आणि अहं नसतो. त्याच्याशी एकरूप व्हायचे असेल, तर आपल्यातही ते नसणे आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी बुद्धीपलीकडील देव नसतो’, असे म्हणणे, हे बालवाडीतील मुलाने वैद्य, अधिवक्ता इत्यादी नसतात’, असे म्हणण्यासारखे आहे !’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘आधीच्या युगांत प्रजा सात्त्विक असल्याने ऋषींना समष्टी प्रसारकार्य करावे लागायचे नाही. आता कलियुगात बहुतेकजण साधना करत नसल्याने संतांना समष्टी प्रसारकार्य करावे लागते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधनेचा आलेख चढता ठेवल्याविषयी पू. शिवाजी वटकर यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण केलेले कृतज्ञतापुष्प !

मागील २९ वर्षांपासून मी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार गुरुकृपायोगानुसार साधना करत आहे. वयाच्या ४५ व्या वर्षापर्यंत मला ‘साधना, अध्यात्म, संत, जीवनाचे नेमके ध्येय काय असावे ?’ इत्यादीविषयी काहीच ठाऊक नव्हते.

व्यष्टी साधनेच्या अंतर्गत नम्रता आणि प्रेमभाव वाढवण्याचे प्रयत्न करत असतांना केलेले भावप्रयोग !

व्यष्टी साधनेच्या अंतर्गत मी नम्रता आणि प्रेमभाव वाढवण्याचे प्रयत्न करत आहे; मात्र अजून अपेक्षित असे यश मिळाले नाही. त्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले (परम पूज्य) यांना प्रार्थना केल्यावर त्याच्या कृपेने माझ्याकडून पुढील प्रयत्न झाले.

गुरुचरणी शरण गेल्यामुळेच आनंद मिळू शकणे

संत तुकाराम महाराज यांनी अभंगात म्हटले आहे, ‘सुख पाहतां जवापाडें । दुःख पर्वताएवढें ॥ धरीं धरीं आठवण । मानीं संतांचें वचन ॥’ या अभंगातील पहिल्या ओवीनुसार मी वयाच्या ४५ वर्षापर्यंत व्यावहारिक जीवनात सुख शोधत होतो; मात्र मला सुख जवाच्या बी समान छोटे आणि दुःख पर्वताएवढे अनुभवायला मिळाले.


Multi Language |Offline reading | PDF