रस्ता रुंदीकरणाचे काम औद्योगिक वसाहतीकडून चालू न केल्यास कुपवाड शहर बंद करून निषेध करण्यात येईल ! – नगरसेवक गजानन मगदूम

कुपवाड मुख्य रस्ता भारत सूतगिरणी ते औद्योगिक वसाहत यामधील डांबरीकरण आणि रुंदीकरण याचे काम चालू करतांना ते औद्योगिक वसाहतीकडून न करता चुकीच्या मार्गाने म्हणजे भारत सूतगिरणीकडून चालू करण्यात आले आहे. परिणामी औद्योगिक वसाहतीकडून होणारी जड वाहतूक ही मुख्य गावातून होत आहे.

हिंदुत्वनिष्ठांच्या हत्येचे अन्वेषण ‘राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणे’कडे सोपवण्याविषयी शासनदरबारी द्यावयाचे निवेदन

हिंदुत्वनिष्ठांच्या हत्येचा तपास ‘राष्ट्रीय तपास यंत्रणे’कडे सोपवण्याच्या संदर्भात शासनदरबारी द्यावयाचे निवेदन येथे देत आहोत.

इचलकरंजीतील बालिका अत्याचाराशी संबंधित आरोपींना फाशीची शिक्षा द्या !

दिवाळीच्या कालावधीत इचलकरंजीत संपूर्ण महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना घडली. चार नराधमांनी एका बालिकेवर अत्याचार केले. यामुळे संपूर्ण समाजमनावर आघात झाला आहे.

‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ हा चित्रपट वादाच्या भोवर्‍यात

आगामी ‘कुलकर्णी चौकातील देशपांडे’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या आधी वादाच्या भोवर्‍यात सापडला असून शहरातील ब्राह्मण संघटनांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. चित्रपटाच्या शीर्षकावरूनच त्यामध्ये ब्राह्मण समाजाला लक्ष्य करण्यात आल्याचे दिसून येते, तसेच चित्रपटाच्या ‘ट्रेलर’वरूनही त्यामध्ये संस्कृतीविरोधी संवाद, दृश्ये आणि संदेश असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

न्यायालयाने विशेषाधिकारात स्वत: याचिका प्रविष्ट करून राज्य शासनाला निर्देश द्यावेत ! – अधिवक्त्यांचे मुंबई उच्च न्यायालयाला पत्र

वडाळा (मुंबई) येथे विजय सिंह याच्या पोलीस कोठडीतील मृत्यूचे प्रकरण