युद्धाची सिद्धता करा ! – चिनी सैन्याला शी जिनपिंग यांचा आदेश

चीनच्या आसुरी विस्तारवादाला कधी ना कधी वेसण घालणे अत्यावश्यकच आहे. त्यासाठी भारत सरकारने सर्वतोपरी कठोर पावले उचलावीत. समस्त राष्ट्रभक्त सरकारच्या पाठीशी उभे असतील !

(म्हणे) ‘भारत आणि चीन सीमावादात मध्यस्थ करण्यास सिद्ध !’ – डोनाल्ड ट्रम्प

भारत आणि चीन यांच्यात सध्या चालू असलेल्या सीमावादावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्यास सिद्ध असल्याचे ट्वीट करून म्हटले आहे.

ऑनलाईन वेबसिरिजवर नियंत्रणासाठी सेन्सॉर बोर्डासारखी यंत्रणा उभारावी ! – हिंदु जनजागृती समिती

अशी मागणी का करावी लागते ? सरकारी यंत्रणांनी हे स्वतःहून करणे अपेक्षित आहे !

पंतप्रधानांच्या घोषणेनंतरच प्रार्थनास्थळे उघडण्यात येतील ! – कर्नाटक सरकारचे घुमजाव

कर्नाटक सरकारने ३१ मे नंतर राज्यातील सर्व मंदिरे, मशिदी आणि चर्च उघडण्याची घोषणा केली होती; मात्र अवघ्या काही घंट्यांतच सरकारने कोलांटउडी घेत पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेनंतरच याविषयी निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा केली.

पाताल लोक वेबसीरिज् च्या निर्मात्या अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या विरोधात देहलीत तक्रार प्रविष्ट

या वेबसीरिज् मुळे हिंदू आणि शीख यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. याच्या २ भागांमध्ये आक्षेपार्ह दृश्ये दाखवण्यात आली आहेत.

(म्हणे) ‘ख्रिस्ती मिशनरी हिंदूंचे धर्मांतर करतात, तर मी काय करू ?’

आंध्रप्रदेशमध्ये सत्तेवर असलेल्या वाय.एस्.आर्. काँग्रेसचे खासदार रघु कृष्णा राजू यांचे दायित्वशून्य विधान !

(म्हणे) ‘सीमावादाविषयी आमचे धोरण स्पष्ट !’ – चीन

भारतासमवेत सीमेवरील स्थिती पूर्णपणे स्थिर आणि नियंत्रणात आहे. दोन्ही देशांकडे चर्चा करून मार्ग काढण्यासाठी योग्य यंत्रणा आहेत. सीमेच्या संदर्भातील सूत्रांवर चीनचे धोरण स्पष्ट आणि सुसंगत आहे.

भारतात टिक-टॉक अ‍ॅप डाऊनलोड करण्याच्या संख्येत लक्षणीय घट

कोरोनाचा प्रभाव आणि राष्ट्रप्रेमींच्या विरोधाचा परिणाम !

अश्‍लीलता, हिंसा आणि हिंदुद्वेष पसरवणार्‍या ‘वेबसीरिज’चे परीनिरीक्षण करण्याच्या मागणीवरून ‘ट्विटर ट्रेंड’

गत काही वर्षांमध्ये अ‍ॅमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स, अल्ट बालाजी, झी ५ यांसारखी अनेक ‘अ‍ॅप’ प्रचलित होत आहेत. त्यांवर नवीन ‘वेबसिरीज’ (ऑनलाईन मालिका) येत असतात. या वेबसिरीज कोणतेही प्रमाणपत्र न घेता अथवा परीनिरीक्षण न करता प्रसारित केल्या जातात.

(म्हणे) भारत शेजारी देशांसाठी धोका बनत चालला आहे ! – पाकचे पंतप्रधान इम्रान खान

नागरिकता कायद्याच्या माध्यमातून बांगलादेश, नेपाळ आणि चीन समवेत सीमावाद अन् पाकिस्तानला सैनिकी कारवाईची पोकळ धमकी देत आहे, असे ट्वीट पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले.