पिता हा आकाशापेक्षा श्रेष्ठ आहे !
‘मातृदेवो भव’, हा जसा आदेश आहे, त्याप्रमाणेच ‘पितृदेवो भव’, हाही एक आदेश आहे. मुलाला जन्म देण्यात, त्याचे पालन-पोषण करण्यात आईला अपरंपार कष्ट उपसावे लागतात, हे खरेच; पण बापालाही मुलाला वाढवतांना अतिशय दक्ष रहावे लागते.