अल्पवयीन हिंदु मुलीचे बलपूर्वक धर्मांतर आणि विवाह केल्याच्या प्रकरणात कारवाई करण्याचा आदेश

पाकमधील न्यायालयाचा आदेश : एखाद-दुसर्‍या प्रकरणात पाक न्यायालयाने असा निर्णय दिल्याने काहीही साध्य होणार नाही आणि अशा घटना थांबणार नाहीत ! भारताने अशा घटनांमध्ये थेट हस्तक्षेप करून तेथील हिंदु मुलींना न्याय देणे अपेक्षित आहे !

(म्हणे) ‘सीएएमुळे बहुसंख्य मुसलमान निर्वासित होतील !’- संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस गुटरेस

गुटरेस यांनी भारतातच गेल्या ३ दशकांपासून धर्मांधांच्या अत्याचारांमुळे विस्थापित झालेल्या हिंदूंविषयी कधी विधान केले आहे का ? भारतात घुसखोरी केलेल्यांना देशात थारा न देण्याचा भारताला अधिकार आहे. जर संयुक्त राष्ट्रांना या घुसखोरांची काळजी वाटत असेल, तर त्यांनी त्यांना घेऊन जावे !

भारताच्या भीतीने पाकने मसूद अझहरला बॉम्बप्रूफ घरामध्ये लपवले आहे ! – भारतीय गुप्तचर यंत्रणांची माहिती

कुख्यात आंतरराष्ट्रीय आतंकवादी मौलाना मसूद अझहर सध्या बेपत्ता असल्याचे पाककडून सांगण्यात येत असले, तरी भारतीय गुप्तचर यंत्रणांनी तो बहावलपूरमधील जैश-ए-महंमदच्या मुख्यालयाच्या मागच्याबाजूला सर्वोच्च सुरक्षा व्यवस्थेमध्ये एका बॉम्बप्रूफ घरामध्ये लपल्याची माहिती मिळाली आहे.

(म्हणे) ‘पाकिस्तान आता आतंकवाद्यांसाठी ‘सुरक्षित भूमी’ नाही !’ – इम्रान खान

याचाच अर्थ यापूर्वी पाक आतंकवाद्यांना साहाय्य करत होता, असा होतो. इम्रान खान यांनी कितीही अशी विधाने केली, तरी जगाला सत्य काय आहे ते ठाऊक आहे.

(म्हणे) ‘हा भारत नसून पाक असल्याने प्रत्येकाच्या घटनात्मक अधिकारांचे रक्षण करणार !’

‘चोराच्या उलट्या बोंबा’ ही म्हण सार्थ ठरवणारे . . . ! पाकच्या न्यायाधिशांना हे ठाऊक आहे की, अनुमतीविना आंदोलन करू नये आणि ते संबंधितांनाही तोच सल्ला देत आहेत; मात्र भारतातील पाकप्रेमी धर्मांधांना हे ठाऊक असूनही ते जाणीवपूर्वक शाहीन बाग येथे विनाअनुमती गेले २ मास आंदोलन करून जनतेला त्रास देत आहेत !

१४ वर्षीय ख्रिस्ती मुलीचे बळजोरीने धर्मांतर करून विवाह करण्याला पाकच्या न्यायालयाची मान्यता

ऑक्टोबर २०१९ मध्ये येथील हुमा या १४ वर्षे वयाच्या ख्रिस्ती धर्मातील मुलीचे अपहरण करण्यात आले. हुमा हिचे पिता युनिस आणि आई नघीना मसीह यांच्या म्हणण्यानुसार हुमाचे बलपूर्वक इस्लाम धर्मात धर्मांतर करण्यात आले. त्यानंतर अपहरण करणारा अब्दुल जब्बार याच्याशी विवाह करण्यास तिला भाग पाडले.