काळ्या पैशांचा प्रादुर्भाव !

राजस्थानमधील काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ‘सर्व पक्षांना काळ्या पैशांतूनच देणग्या मिळतात. काळ्या पैशांंवर निवडणूक जिंकणार्‍यांकडून देशातील भ्रष्टाचार नष्ट करण्याची अपेक्षा कशी केली जाऊ शकते ?’, असे विधान केले.

मंदिरांच्या सुव्यवस्थापनाला भक्तांची विचारधाराच पोषक !

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमधील देवीचे दागिने गहाळ प्रकरणाचा १०५ पृष्ठांचा अहवाल त्रिसदस्यीय समितीने जिल्हाधिकार्‍यांना नुकताच सादर केला.

कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे संगणकीकरण

‘केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ‘ई-नाम’ ही संकल्पना कार्यान्वित करण्याची घोषणा केली आहे. याविषयी शेतकरी आणि या व्यवसायाशी संबंधित यांच्या मनामध्ये अनेक प्रश्‍न अन् अपेक्षा आहेत. याविषयीची काही प्राथमिक सूत्रे येथे देण्यात आली आहेत.

क्रिकेट या खेळातील अंधविश्‍वास

भारतात क्रिकेट या खेळाला विशेष स्थान आहे, तसेच क्रिकेटपटूंकडे आदर्श म्हणून पाहिले जाते. हे खेळाडू चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून संघाला विजय मिळवून देतात आणि स्वतःही नाव कमावतात. काही वेळा खेळ चांगला खेळता यावा, त्यात यश मिळावे यांसाठी परिश्रम आणि क्षमतेचा पूर्ण वापरही करतात. काही खेळाडू यश मिळवण्यासाठी ठराविक रंग किंवा क्रमांक स्वत:समवेत बाळगतात, तर काहीजण सुरक्षेसाठी काही आवडत्या वस्तू समवेत ठेवतात. यामुळे ‘खेळ चांगला खेळला जातो’, असा त्यांचा विश्‍वास असतो.

सुशिक्षित ‘अशिक्षित’ !

भारतामधील बहुतेक शिक्षित तरुण नोकरी करण्याच्या योग्यतेचे नसतात आणि ते कोणत्याही प्रकारच्या परीक्षेत स्वत:ला सिद्ध करू शकत नाहीत, अशी धक्कादायक माहिती भारतीय वाणिज्य आणि उद्योग मंडळाच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.

खासगी रुग्णवाहिकांकडून होणारी आर्थिक लूट थांबवा !

बहुतांश डॉक्टर, औषधविक्रेते, प्रयोगशाळातज्ञ हे अवाजवी दर आकारून रुग्णांना लुबाडतात असाच सर्वत्र अनुभव येतो. यात आता तर रुग्णालयाबाहेर उभ्या असलेल्या रुग्णवाहिकांचीही भर पडलेली आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या देहली, हरियाणा आणि पश्‍चिम उत्तरप्रदेश येथील सप्टेंबर २०१९ मधील धर्मप्रसाराच्या कार्याचा आढावा

‘विश्‍वकल्याणकारी हिंदु राष्ट्राचा संकल्प करण्याच्या हेतूने हिंदु जनजागृती समितीने पश्‍चिम उत्तरप्रदेशातील आग्रा येथे १५.९.२०१९ या दिवशी ‘हिंदु राष्ट्र परिसंवादा’चे आयोजन केले होते. परिसंवादात विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांना मार्गदर्शन केले.