लंडनजवळ दुसर्‍या महायुद्धातील ९०० किलोचा बॉम्ब सापडला !

लंडनच्या जवळील एक्सेटर शहरामध्ये दुसर्‍या महायुद्धातील ९०० किलोचा जिवंत बॉम्ब सापडल्यानंतर त्याला निकामी करण्यासाठी येथील संपूर्ण परिसर रिकामी  करण्यात आला. हा बॉम्ब इतका शक्तीशाली होता की, तो निकामी करतांना झालेल्या स्फोटाचा आवाज १० किमी अंतरापर्यंत ऐकू गेला.

फ्रान्सचे माजी राष्ट्रपती निकोलस सर्कोझी यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणी ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

भारतात उच्चपदांवर कार्यरत असणार्‍या भ्रष्ट राजकारण्यांना कधी शिक्षा होते का ?

वर्षाच्या शेवटपर्यंत कोरोना महामारी संपेल, असे समजणे चुकीचे ! – जागतिक आरोग्य संघटना

देशांनी कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

लंडन येथील न्यायालयाने भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांना फटकारले !

न्यायाधीश सॅम गूझी यांनी काटजू यांना फटकारता म्हटले की, या प्रकरणातील काटजू यांची भूमिका आश्‍चर्यकारक, आक्षेपार्ह आणि असंवेदनशील आहे. ‘सरकारने जाणूनबुजून माध्यमांमध्ये या प्रकरणाची राळ उडवली’, ही काटजू यांंची भूमिका आम्ही नाकारत आहोत.

पाक ‘फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’च्या करड्या (ग्रे) सूचीमध्ये कायम !

पाकचे जिहादी आतंकवाद्यांना मिळणारे साहाय्य पहाता त्याला काळ्या सूचीत घालणेच योग्य ठरणार आहे !

जर्मनीमध्ये इस्लामिक स्टेटच्या माजी इमामाला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

भारतातही असे कितीतरी कट्टरतावादी इमाम आणि मौलवी मोकाट आहेत. त्यांच्यावर भारत कधी कारवाई करणार ?

युरोपमध्ये येणार्‍या मुसलमान शरणार्थींविषयी सजग करणार्‍या कार्डिनलची पोपकडून हकालपट्टी !

एखादा पाद्री भविष्यात घडणार्‍या घटनांविषयी आधीच सतर्क करत असेल आणि त्याच्यावर जर अशी कारवाई होणार असेल, तर युरोपमधील लोकांची सुरक्षा वार्‍यावरच आहे, असेच म्हणावे लागेल !

फ्रान्स सरकारने संसदेत संमत केले धर्मांधांवर नियंत्रण ठेवणारे विधेयक !

आतापर्यंत भारत ढोंगी धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी निष्क्रीयच राहिला आहे ! फ्रान्स धर्मनिरपेक्षतेचे पालन होण्यासाठी कायदा करत आहे, हे भारताने आणि भारतातील तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांनी लक्षात घ्यावे !

हिंसाचारासाठी चिथावणी दिल्यावरून ब्रिटनमधील ‘खालसा टीव्ही’ वाहिनीला ५० लाख रुपयांचा दंड !

ब्रिटनमध्ये चुकीचे आणि समाजविघातक प्रसारण करणार्‍या वाहिन्यांवर कारवाई होते. भारताने यातून बोध घेणे आवश्यक !

कोरोनापेक्षाही १० पट भयंकर असेल भविष्यातील महामारी ! – बिल गेट्स यांची चेतावणी

‘कोरोनाची लागण ५ वर्षांपूर्वी झाली असती, तर त्यावरील औषध इतक्या लवकर बनवणे शक्य नव्हते,’