मलेशियातील ७ राज्यांमध्ये डॉ. झाकीर नाईक यांना धार्मिक भाषण देण्यावर बंदी

हिंदूंच्या विरोधात धार्मिक द्वेष पसरवल्याचे प्रकरण :  इस्लामबहुल मलेशिया डॉ. झाकीर नाईक याच्यावर कठोर कारवाई करणार नाही, हे लक्षात घ्या ! त्यामुळे भारत सरकारनेच त्याच्या मुसक्या आवळून त्याला भारतात आणून शिक्षा करणे आवश्यक !

एस्.एम्. मुश्रीफ यांचे ‘ब्राह्मनिस्ट बॉम्बड्, मुस्लिम्स हँग्ड’ नावाचे अजून एक ब्राह्मणद्वेष्टे वादग्रस्त पुस्तक

अशा जातीयवादी पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे फलक शहरात सर्वत्र लागले असूनही समतेच्या गप्पा मारणारी अंनिस, तसेच अन्य पुरो(अधो)गामी संघटना अन् राजकीय पक्ष अज्ञातवासात गेले आहेत. पुरो(अधो)गाम्यांचे हे मौन जनतेच्या नजरेतून सुटणारे नाही. हे मौनच बरेच काही सांगणारे आहे…

बंगालमध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेत जय श्रीरामच्या घोषणेमुळे होणारे दुष्परिणाम या विषयावर प्रश्‍न विचारला !

तृणमूूल काँग्रेसच्या हिंदुद्वेषी राजवटीत याहून वेगळे काय घडणार ? हिंदु विद्यार्थ्यांचे सुदैव की, त्यांना अन्य धर्मियांच्या घोषणामुळे काय लाभ होतात?, असे विचारण्यात आले नाही !

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या आणि नक्षलसमर्थक असणार्‍या अंनिसच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला अनुमती नाकारावी !

मुलुंड येथील कालिदास नाट्यमंदिरात ९, १० आणि ११ ऑगस्ट या दिवशी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या त्रिदशकपूर्ती वर्षानिमित्त राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.

(म्हणे) ‘दहशतीच्या मार्गाने काश्मीर मिळवण्याचा सरकारचा प्रयत्न !’ – मेहबूबा मुफ्ती

दहशतीच्या मार्गानेच काश्मीरवर आतापर्यंत बहुसंख्य असणार्‍या मुसलमानांचा अधिकार होता, तोच आता रहित झाल्याने मेहबूबा मुफ्ती थयथयाट करत आहेत ! याच मार्गाने काश्मीरमधून साडेचार लाख हिंंदूंना पळवून लावण्यात आले, सहस्रो हिंदूंना ठार करण्यात आले, हिंदु महिलांवर बलात्कार करण्यात आले, तेव्हा मेहबूबा मुफ्ती कुठे होत्या ?

श्री पद्मनाभस्वामी मंदिरासमोर कारागृह प्रशासनाकडून होणारी मांसाहारी अन्नपदार्थांची विक्री हिंदूंनी बंद पाडली

धर्मरक्षणार्थ वैध मार्गाने लढा देणार्‍या हिंदूंचे अभिनंदन ! मंदिराच्या परिसरात मांसाहारी पदार्थ विकायचे नसतात, हे कारागृह प्रशासनाला ठाऊक नाही का कि जाणूनबुजून संबंधितांकडून ही कृती केली जात होती ?

स्वतः चोरीच्या घटना रोखायच्या नाहीत आणि जनतेने त्याविषयी केलेल्या तक्रारीला साधा प्रतिसादही द्यायचा नाही, हा पोलिसांचा उद्दामपणा नव्हे का ?

यमुनानगर (हरियाणा) येथे पोलिसांच्या वेशात आलेल्या ४ चोरांनी पुजार्‍याला मारहाण करत शिवमंदिरात चोरी केल्याची घटना ४ जुलैच्या पहाटे घडली.

कर्नल प्रसाद पुरोहित यांना अटक करणे, हे काँग्रेसचे हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचे षड्यंत्र ! – खासदार सुब्रह्मण्यम् स्वामी, भाजप

‘समझौता एक्सप्रेस’मधील बॉम्बस्फोट प्रकरणात चिदंबरम् यांनी याविषयी स्वत:च्या हाताने ‘अ‍ॅफिडेविट’ सिद्ध केले. मालेगाव बॉम्बस्फोटातही हाच प्रकार करण्यात आला. कर्नल प्रसाद पुरोहित यांना केवळ पुढे करण्यात आले. हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासाठी काँग्रेसने हे षड्यंत्र केले. – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

‘आर्टिकल १५’ हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही ! – अजयसिंह सेंगर, अध्यक्ष, महाराष्ट्र करणी सेना

हिंदू जागरूक नसल्यामुळेच आज चित्रपट, नाटके, विज्ञापने आदींच्या माध्यमातून हिंदु धर्म, देवता, संत, ब्राह्मण यांची सातत्याने नालस्ती आणि विडंबन केले जाते. जन्महिंदू या धर्महानीकडे मनोरंजन म्हणून पहातात. ही धर्महानी थांबण्यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन वैध मार्गाने प्रयत्न करणे आवश्यक आहे !

भूमी बळकावण्याच्या संशयावरून आदिवासींनी नमाजपठण करणार्‍या मुसलमानांना बाण मारून पळवून लावले !

बिहार-बंगाल राज्यांच्या सीमेवर धुलबरी गावात काही मुसलमान येथील चहाच्या मळ्यात नमाजपठणासाठी गेले होते. तेव्हा येथील आदिवासींना वाटले की, ते त्यांची भूमी बळकावण्यासाठी आले आहेत. त्यामुळे आदिवासींनी धनुष्य बाणांद्वारे मुसलमानांवर आक्रमण केले.


Multi Language |Offline reading | PDF