बेंगळुरूमध्ये रेमडेसिविरच्या रिकाम्या कुपीमध्ये ग्लुकोज भरून विक्री करणार्‍या एका डॉक्टरसह वॉर्डबॉयला अटक

शहरात नकली रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री करणारे खासगी रुग्णालयाचे डॉ. सागर आणि वॉर्डबॉय कृष्णा यांना पोलिसांनी अटक केली आहे. अर्धेच इंजेक्शन रुग्णांसाठी वापरून उरलेले काळ्या बाजारात विकत होते.

निधन वार्ता

संकेश्‍वर येथील सनातनच्या साधिका सौ. सुजाता अशोक मोकाशी (वय ४७ वर्षे) यांचे १४ मे या दिवशी कोरोनाबाधित असल्याने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पती, २ मुली असा परिवार आहे. सनातन परिवार मोकाशी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.

…तर काय आम्ही स्वतःला फासावर लटकवून घ्यायला हवे का ?

शासनकर्त्यांनी जनतेच्या प्रश्‍नांना सामोरे जाऊन त्यांचे शंकानिरसन करणे आवश्यक असते; मात्र ते करतांना चिडत असल्यास जनतेच्या मनात कधीतरी त्यांच्याविषयी सद्भावना निर्माण होऊ शकेल का ?

जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार केल्यास गुन्हा नोंद करण्याची बेळगाव जिल्हाधिकार्‍यांची चेतावणी

जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून काळाबाजार केल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा नोंद करण्यात येईल, अशी चेतावणी जिल्हाधिकारी एम्.जी. हिरेमठ यांनी दिली.

बेळगाव शहरातील ‘माई’ रुग्णालयावर आक्रमण करणार्‍या ५० जणांवर गुन्हा नोंद

येथील माई रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जातात. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आपणाला कोरोनाचा संसर्ग होईल, या भीतीने रुग्णालयातील आधुनिक वैद्य आणि तेथील कर्मचारी यांच्यावर आक्रमण केले.

बेळगाव शहरातील ‘श्री रेणुकादेवी मंदिर न्यासाद्वारे’ निराधार लोकांना अन्नदान

कोणत्याही संकटकाळात हिंदूंची मंदिरे नेहमी गरजवंतांना साहाय्य करतात.

ज्येष्ठ पत्रकार आणि रा.स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अर्जुनराव केदारी गौंडाडकर यांचे निधन

कंग्राळ गल्ली येथील ज्येष्ठ पत्रकार आणि रा.स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अर्जुनराव केदारी गौंडाडकर (वय ८२ वर्षे) यांचे ९ मे या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. अर्जुनराव गौंडाडकर यांनी दैनिक पुढारीच्या कार्यालयात अनेक वर्षे सेवा केली.

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कर्नाटकातील नागक्षेत्र कुक्के सुब्रह्मण्य येथे एक सप्ताह धन्वंतरी होम !

दक्षिण भारतातील प्रसिद्ध नागक्षेत्र कुक्के सुब्रह्मण्य येथे कोरोना महामारीवर नियंत्रण आणण्यासाठी, तसेच लोककल्याणार्थ विशेष पूजेला प्रारंभ करण्यात आला आहे. ५ मे ते ११ मेपर्यंत एक सप्ताह पूजा, होम-हवन करण्यात येणार आहे.

विशाळगडावरील अतिक्रमणांच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांनी दिलेल्या निवेदनाची शासनाकडून नोंद

विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून, दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करा, या मागणीचे निवेदन निपाणी येथील हिंदुत्वनिष्ठ अभिनंदन भोसले यांनी ई-मेलद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, भारतीय पुरातत्व खाते यांच्याकडे पाठवले आहे.

एकही खाट रिकामी नसतांना आता ३ सहस्र २१० खाटा एका दिवसात रिकामी !

भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी शहरातील रुग्णालयांमधील खाटा मिळण्यासाठी लाच घेण्यात येत असल्याचा आरोप केल्यानंतर आता रुग्णालयांत ३ सहस्र २१० खाटा रिकामी असल्याचे या संदर्भातील संकेतस्थळावर दाखवण्यात येत आहे.