एकीकडे ‘स्वच्छ भारत अभियान’, दुसरीकडे अनधिकृत होर्डिंगमुळे शहर विद्रूप !

नवी मुंबईतील वास्तव !

प्रतिकात्मक चित्र

नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये ‘स्वच्छ भारत अभियान’ जोरात चालू आहे; पण राजकीय नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत होर्डिंग लावण्यात आल्याने शहर विद्रूप झाले आहे. अभियानाच्या अनुषंगाने केंद्रीय स्तरावरील समिती पहाणी करत आहे. घनकचरा विभाग शहरातील स्वच्छतेसाठी प्रयत्नरत आहे; पण या अनधिकृत फलकांवर प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही. पालिका मुख्यालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

संपादकीय भूमिका :

याविषयी महानगरपालिकेला काय सांगायचे आहे ? पालिका मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारी संबंधितांवर कठोर कारवाई करणार का ?