‘हर घर जल’ योजना २ वर्षे रखडल्याने कुडासे गावावर पिण्याच्या पाण्याचे संकट 

केंद्र सरकारच्या ‘हर घर जल’ (प्रत्येक घरी पिण्याचे पाणी) योजनेच्या अंतर्गत जलजीवन मिशनच्या माध्यमातून करण्यात येणारे कुडासे गावातील नळपाणी पुरवठा योजनेचे काम गेल्या २ वर्षांपासून रखडले आहे.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यासाठीचे उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर स्थगित !

आरोग्याविषयीच्या समस्या सुटण्यासाठी जनतेला उपोषण किंवा आंदोलन करावे लागणे, हे आरोग्य यंत्रणेला लज्जास्पद !

लक्षतीर्थ वसाहतीमध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या ३७५ व्या अमृतमहोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने भव्य वैकुंठगमन सोहळ्यास प्रारंभ !

लक्षतीर्थ वसाहतीमध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या ३७५ व्या अमृतमहोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने २४ ते २८ मार्च या कालावधीत भव्य वैकुंठगमन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

बनावट गुणपत्रिका देणार्‍या महाविद्यालयांची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार ! – पंकज भुईर, मंत्री

मुंबई येथील विद्याविहारमधील के.जे. सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, एस्.के. सोमय्या विनय मंदिर हायस्कूल अँड  ज्युनिअर कॉलेज, के.जे. सोमय्या कॉलेज ऑफ आर्टस् अँड  कॉमर्स या महाविद्यालयांत बनावट गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला सादर करून विद्यार्थ्यांनी इयत्ता ११ वीमध्ये अनधिकृत प्रवेश मिळवल्याचे निदर्शनास आले आहे.

सातारा येथे रहिवासी इमारतींमध्ये थुंकू नये म्हणून देवतांची चित्रे लावणार्‍यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची मागणी !

देवतांच्या चित्रांवर थुंकणार्‍यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी निवेदन द्यावे लागणे, हे हिंदूंसाठी दुर्दैवी !

ठाणे येथे शिवसेनेकडून कुणाल कामराचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न !

कुणाल कामरा याच्या विरोधात शिवसेनेने येथील टेंभीनाका परिसरात त्याचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याच्याविरोधात घोषणा दिल्या.

नागपूर येथील जिहाद्यांवर कठोर कारवाई करण्याची विश्व हिंदु परिषदेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

औरंगजेबाच्या कबरीसाठी देण्यात येणारा शासकीय खर्च आता बंद करून ही कबर हटवून त्या जागेवर औरंगजेबाला पराभूत करणार्‍या शूरवीर धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे, तसेच छत्रपती राजाराम महाराज यांचे भव्य स्मारक उभे करावे…

पेण अर्बन बँक आणि संचालक यांची मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत करणार ! – बाळासाहेब पाटील, सहकार मंत्री

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले की, या प्रकरणी अनेक चौकशी झाल्या आहेत. हे प्रकरण किचकट झाले आहे. या प्रकरणातील दोषी संचालकांच्या ९७ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.

औरंगजेबाची स्तुती करणार्‍यावर रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद !

रफिक कुरेशी असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी बजरंग दलाचे नवी मुंबई जिल्हा सहसंयोजक तेजस पाटील यांनी तक्रार प्रविष्ट केली होती.

राज्यातील प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी आराखडा सिद्ध करून अर्थसंकल्पात निधीचे प्रावधान करू ! – पंकज भुईर, मंत्री

राज्यातील सर्व जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी आराखडा सिद्ध केला जाईल, तसेच अर्थसंकल्पात त्याविषयी निधीचे प्रावधान करून महाराष्ट्रातील शाळा बळकट केल्या जातील