बार्शी (सोलापूर) येथे पोलीस आणि अन्य दोन कर्मचारी यांना धर्मांधांकडून मारहाण; ८ धर्मांधांवर गुन्हा नोंद

दळणवळण बंदी चालू असल्याने घरी जाण्यास सांगितल्याने धर्मांधांनी पोलीस आणि अन्य कर्मचारी यांना मारहाण केली. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी येथील गाडेगाव रोड ४२२ भागातील ८ धर्मांधांच्या विरोधात बार्शी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

विदेशी नागरिकालाही भारतातील आंदोलनात सहभागी होण्याचा अधिकार ! – कोलकाता उच्च न्यायालय

भारतामध्ये रहाणार्‍या विदेशी नागरिकालाही भारतीय राज्यघटनेच्या कलम २१ अनुसार व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. विदेशी नागरिक या कलमाच्या अंतर्गत भारतातील आंदोलनात सहभागी होऊ शकतात, असा निर्णय कोलकाता न्यायालयाने दिला आहे.

‘ते’ ६ जण कोण ?

एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत गोगोई म्हणाले, ‘‘स्वतःच्या मनाप्रमाणे निर्णय मिळवण्यासाठी ६ जणांची टोळी न्यायाधिशांवर दबाव आणते. जर या टोळीच्या मनाप्रमाणे निकाल दिला नाही, तर ती टोळी संबंधित न्यायाधिशाला अपकीर्त आणि कलंकित करते.

विनाकारण रस्त्यावर येणार्‍यांवर कडक कारवाई करा !  – उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ

वाहतूक रोखण्यासमवेत अंतर ठेवण्याविषयी आवश्यक उपाययोजना करा. विनाकारण रस्त्यावर येणार्‍यांवर कडक कारवाई करा, असे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने दिले.

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ‘हँडवॉश’चे वादग्रस्त विज्ञापन रहित

आजारांपासून दूर रहायचे असेल, तर साबण नाही, तर ‘डेटॉल’चे ‘हँडवॉश’च वापरायला हवे, असे लोकांमध्ये भीतीचे वातावरण वाढवणारे विज्ञापन कसे करता ?, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने ‘रेकिट बेंकिसर आस्थापना’ला फटकारले.