गोव्यातील रस्त्यालगतची अनधिकृत व्यावसायिक आस्थापने हटवण्यासाठी १५ दिवसांची मुदत !
गोवा सरकारने राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग यांपासून २० मीटरच्या अंतरात अनधिकृतरित्या बांधण्यात आलेली तात्पुरती किंवा कायमस्वरूपी व्यावसायिक आस्थापने हटवण्यासाठी १५ दिवसांची समयमर्यादा देणार्या नोटिसा संबंधितांना पाठवल्या आहेत.