कुडाळ शहरात ‘व्हिडिओ गेम पार्लर’वर पोलिसांची धाड
‘व्हिडिओ गेम’च्या नावाखाली जुगार चालू असलेल्या कुडाळ बसस्थानक समोरील ‘ओमसाई व्हिडिओ गेम पार्लर’वर पोलिसांनी २१ मार्च या दिवशी दुपारी १२ वाजता धाड टाकली.
आधुनिक वैद्यांना जेनेरिक औषधे लिहिण्यास सांगू ! – मंत्री नरहरी झिरवाळ
राज्यातील जेनेरिक औषधे एम्.आर्.पी.पेक्षा अधिक रकमेने विकता येणार नाही. अशा विक्रेत्यांच्या विरोधात कारवाई करू, तसेच रुग्णालयातील आधुनिक वैद्यांना जेनेरिक औषधे लिहिण्यास सांगता येईल, असे स्पष्टीकरण अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले.
औरंगजेबाच्या थडग्यावरील फलक हटवण्याचे आदेश अधिवेशनातच द्या ! – माजी आमदार नितीन शिंदे
औरंगजेबाचे उदात्तीकरण थांबवण्याचे आदेश प्रशासनाला द्यावेत, अशी मागणी हिंदु एकता आंदोलनाच्या वतीने आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
‘इंस्टाग्राम’वर ओळख झालेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार करणार्या २ धर्मांधांना अटक !
पुन्हा कुणी असे कृत्य करण्यास न धजावण्यासाठी अशा नराधमांना शरीयतनुसार कठोर शिक्षा देण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये.
आजपासून ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’ची ‘सांगली युवा संसद’ भरणार !
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सांगली जिल्हा आयोजित ‘सांगली युवा संसद’ हे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे दोन दिवसीय प्रति संसदीय अधिवेशन २२ आणि २३ मार्च या दिवशी वसंतदादा पाटील सभागृह, सांगली जिल्हा परिषद येथे आयोजित करण्यात आले आहे.
नागपूर येथे पोलिसांवर आक्रमण करणार्या जिहादी मानसिकतेच्या गुंडांवर कडक कारवाई करा ! – सकल हिंदु समाज
नागपूर येथील प्रकरणाचा सकल हिंदु समाज निषेध करत असून सकल हिंदु समाज महाराष्ट्र पोलीस दलाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. तरी या जिहादी समाजकंटकांवर कडक कारवाई झाली पाहिजे, या मागणीचे निवेदन सकल हिंदु समाजाच्या वतीने देण्यात आले.
राज्यातील औद्योगिक क्षेत्रांतील समस्यांविषयी १५ दिवसांमध्ये बैठक
अमरावती औद्योगिक क्षेत्रांमध्ये महामंडळाकडून ६०६ भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे. त्यातील ५२४ भूखंडावर उद्योग उभारले आहेत. सध्या २० भूखंड मोकळे आहेत.
पालघर येथे पाण्याची टाकी कोसळून २ मुली मृत्यूमुखी : ठेकेदारावर गुन्हा नोंद !
जलजीवन मिशनच्या योजनेतील निकृष्ट दर्जाची कामे करणारे संबंधित ठेकेदार आणि त्याच्याशी संगनमताने भ्रष्टाचार करणार्या प्रशासकीय अधिकार्यांवर कारवाई का होत नाही ?
औरंगजेबाच्या कबरीसाठी आता सैन्यदलाला बोलवावे लागेल !
कबरीच्या संरक्षणासाठी आता सैन्यदलाला बोलवायचे शेष राहिलेले आहे, असे म्हणत औरंगजेबाच्या कबरीला दिलेल्या सुरक्षेवरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली आहे.