पिंपरी (पुणे) येथे रेकी करून सोनाराची दुकाने लुटणार्‍या नेपाळी चोरांना अटक

१८ जून या दिवशी झालेल्या चोरीनंतर चालू असलेल्या अन्वेषणातून या चोरांना विविध जिल्ह्यांतून पकडण्यात आले आहे.

कलादिग्दर्शक राजेश साप्ते यांच्या आत्महत्या प्रकरणी तिसर्‍या आरोपीस अटक !

धर्मेंद्र रावत यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी या आधी चंदन ठाकरे यांना, तर साप्ते यांना धमकावणार्‍या राकेश मौर्य यांना अटक केली.

शहापूर (जिल्हा ठाणे) येथील भूमी अभिलेख कार्यालयातील लाचखोर लिपीक अटकेत !

तक्रारदाराच्या जमिनीच्या मोजणीमध्ये आलेल्या ३ गुंठे फरकाचा पंचनामा करून देण्यासाठी ५ सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी शहापूर येथील भूमी अभिलेख उपअधीक्षक यांच्या कार्यालयातील लिपीक पंडित गोखणे यांनी केली होती.

बाणावली समुद्रकिनार्‍यावर २ अल्पवयीन मुलींवर पोलीस असल्याचा बहाणा करून बलात्कार : चारही संशयित पोलिसांच्या कह्यात

बलात्कार्‍यांवर कठोर कारवाई करण्यासमवेतच समाजाला धर्मशिक्षण आणि युवतींना स्वरक्षण प्रशिक्षण यांची नितांत आवश्यकता !

कोईंबतूर (तमिळनाडू) येथे हिंदूंची मंदिरे पाडल्याच्या विरोधात हिंदु मक्कल कत्छी संघटनेचे आंदोलन

नास्तिकतावादी द्रविड मुन्नेत्र कळघम् (द्रमुक) सरकारच्या काळात हिंदूंच्या मंदिरांवर असे आघात होणार आणि हिंदूंच्या संघटनांवर अन् कार्यकर्त्यांवर कारवाई होणार, यांत आश्‍चर्य ते काय ! अशा घटना कायमच्या रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आदींविषयी अश्‍लाघ्य भाषेत टीका करणार्‍या पाद्य्राला अटक !

आतापर्यंत जगात वासनांध पाद्य्रांच्या कारवाया समोर येत होत्या. आता द्वेषमूलक आणि अश्‍लाघ्य विधाने करणारेही पाद्री आहेत, हेही समोर येत आहे. याविषयी तथाकथित पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी बोलतील का ?

बागपत येथे धर्मांधांनी १५ वर्षीय हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचे धर्मांतर करत गोमांस खाऊ घातले !

अशा वासनांध धर्मांधांना कठोर शिक्षा करण्याची मागणी समाजवादी पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, साम्यवादी आदी राजकीय पक्ष, तसेच पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी का करत नाहीत ?

गर्भपाताच्या औषधांच्या अवैध विक्रीप्रकरणी १४ दिवसांत राज्यात १४ गुन्ह्यांची नोंद !

गर्भपाताच्या औषधांची अवैध विक्री केल्याप्रकरणी २६ जून ते ९ जुलै या कालावधीत राज्यात १४ गुन्हे नोंदवण्यात आले असून या प्रकरणी ११ जणांना अटक झाली आहे.

घुसखोरांसाठी धर्मशाळा बनलेला भारत !

चेन्नई पोलिसांनी अवैधरित्या राहून लूटमार करणार्‍या ९ इराणी मुसलमान नागरिकांना अटक केली. यात ३ महिलांचा समावेश आहे. त्यांच्याकडून बनावट आधार कार्डही जप्त करण्यात आली आहेत.