रावणालाही असाच अहंकार होता ! – नवोदिता घाटगे, भाजप

रावणालाही असाच अहंकार होता. त्यामुळे कागलची जनता ठरवेल की, त्यांना रामराज्य हवे आहे कि नको ? असे प्रत्युत्तर भाजपचे नेते समजरजितसिंह घाटगे यांच्या पत्नी सौ. नवोदिता घाटगे यांनी दिले आहे.

‘मुंबई बँके’च्या अध्यक्षपदी प्रवीण दरेकर यांची बिनविरोध निवड !

मविआच्या काळात बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांची, तर उपाध्यक्षपदी विठ्ठल भोसले यांची निवड करण्यात आली होती. सत्तापालटानंतर दोघांनीही अचानक राजीनामे दिले होते.

राजभवनाकडे मोर्चा नेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ठाणे पोलिसांच्या कह्यात !

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात ‘राजस्थानी आणि गुजराती नसतील, तर मुंबईत पैसाच रहाणार नाही’, असे म्हटले होते. या विधानावरून राज्यात मोठा गदारोळ झाला.

भोसरी भूखंड प्रकरणी एकनाथ खडसे यांना कारागृहात जावे लागेल ! – गिरीश महाजन, आमदार, भाजप

आपली भूमिका स्पष्ट करतांना आमदार एकनाथ खडसे म्हणाले, ‘‘भोसरी भूखंड प्रकरणी आतापर्यंत अनेक चौकशी समित्यांकडून चौकशी झाली. त्यात काही सापडले नाही. फडणवीस सरकारने मी निर्दोष (क्लीनचीट) असल्याचा अहवाल दिला आहे.

देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपतील : केवळ भाजपच शिल्लक रहाणार !  

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा दावा

महाराष्ट्रातील १०४ मदरशांना राज्य सरकारकडून ३ कोटी ८३ लाख रुपयांचे अनुदान !

धर्मनिरपेक्ष देशात धर्माच्या आधारावर मदरशांना अनुदान कशासाठी ?
असे अनुदान कधी हिंदूंच्या संस्थांना दिले आहे का ?

कोलगाव येथील शासकीय गोदामाची इमारत ३ वर्षे धूळ खात पडून

गेली अडीच वर्षे सत्तेत असूनही गोदामाच्या कार्यवाहीसाठी काही न करणारी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणे १५ ऑगस्टपूर्वी कार्यवाही न झाल्यास आंदोलन करणार !

शरद पवार यांनी शिवसेना फोडली, हे उद्धव ठाकरे यांना कधी लक्षात येणार ? – शिवसेनेचे माजी नेते रामदास कदम

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच शिवसेना फोडली आहे, हे उद्धव ठाकरे यांच्या कधी लक्षात येणार ? शिवसेनेचे ५० आमदार पक्ष सोडून का गेले ? याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे, अशा शब्दांत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

बारामती येथील कामांना दिलेली स्थगिती उठवावी !

मुख्यमंत्र्यांनी बारामती येथील कामांना दिलेली स्थगिती उठवावी, तसेच सूडबुद्धीने कोणताही निर्णय घेऊ नये, या मागणीसाठी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळासह १८ जुलै या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

‘औरंगाबाद’ नामांतराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे उपोषण !

महाविकास आघाडी सरकारने ‘औरंगाबाद’चे ‘संभाजीनगर’ आणि ‘उस्मानाबाद’चे ‘धाराशिव’ नामांतर केल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांमध्ये प्रचंड अप्रसन्नता आहे. काँग्रेसच्या शहराध्यक्षांसह अल्पसंख्यांक आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यागपत्रे दिली आहेत.