प्रशासनाने हानीभरपाई देण्याचे आश्वासन दिल्यानंतर कळणे ग्रामस्थांचे आंदोलन स्थगित

कळणे येथील खाण प्रकल्पाचा बंधारा जुलै मासात झालेल्या अतीवृष्टीत फुटून खाणीतील खनिजयुक्त पाणी येथील घरे आणि बागायती यांमध्ये घुसले होते. झालेल्या हानीची भरपाई मिळावी, यासाठी कळणे ग्रामस्थांनी १३ ऑक्टोबर या दिवशी आंदोलन चालू केले.

मास्टर दीनानाथ मंगेशकर शासकीय संगीत विद्यापिठाला मुंबई विद्यापिठाच्या परिसरात जागा देण्याच्या प्रस्तावावर कुलगुरु राजकारण करत असल्याचा युवा सेनेचा आरोप

मुंबई विद्यापिठाच्या ‘कलिना कॅम्पस’मध्ये मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने विद्यापीठ चालू करण्यासाठी राज्यशासनाकडून पाठवण्यात आलेल्या प्रस्तावावर ७ मास होऊनही विद्यापिठाकडून निर्णय घेण्यात आलेला नाही. या प्रकरणी कुलगुरु प्रा. सुहास पेडणेकर राजकारण करत असल्याचा आरोप युवा सेनेच्या सदस्यांनी ८ ऑक्टोबर या दिवशी मुंबई विद्यापिठाच्या अधिसभेत केला.

चर्चने केलेल्या अमानवी छळात होरपळलेली नन ल्युसी कलापुरा आणि न्यायनिवाडा !

एका ननचा अमानवी छळ होत असतांना निधर्मीवाद्यांनी तोंड न उघडणे, हे लोकशाहीला लज्जास्पद !

लखीमपूर खेरी येथे कथित शेतकर्‍यांनी घडवून आणलेल्या हिंसाचारात ९ जण ठार !

ठार झालेल्यांमध्ये ४ शेतकरी आणि ४ भाजपचे कार्यकर्ते यांचा समावेश !
घटनेनंतर झालेल्या हिंसाचारात पत्रकाराचा मृत्यू

तुम्ही पूर्ण देहली शहराचा श्‍वास गुदमरून टाकला आहे !

सर्वोच्च न्यायालयाने महामार्गावर आंदोलन करणार्‍या शेतकरी संघटनांना फटकारले !

चीनच्या अतिक्रमणाच्या विरोधात नेपाळी नागरिकांकडून आंदोलन

अशा प्रकारची आंदोलने करून चीनवर त्याचा काही परिणाम होणार नाही. त्यापेक्षा जनतेने नेपाळच्या सरकारवर दबाव निर्माण करून त्याला चीनविरोधी भूमिका घेण्यास भाग पाडले पाहिजे !

१९ ऑक्टोबरला जयसिंगपूर येथे २० वी ऊस परिषद ! – राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना

१९ ऑक्टोबरला जयसिंगपूर येथे २० वी ऊस परिषद होईल. ‘एफ्.आर्.पी.’चे तुकडे करणार्‍यांच्या विरोधात ‘जागर एफ्.आर्.पी.चा, आराधना शक्तीस्थळांची’ या आंदोलनाचा प्रारंभ जोतिबा डोंगरावर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी होईल.

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या विरोधानंतर उत्तराखंडमधील टिहरी धरणाजवळील अवैध मशीद प्रशासनाने पाडली !  

धरणाजवळ अवैध मशीद बांधली जात असतांना पोलीस आणि प्रशासन झोपले होते का ? जे स्थानिक नागरिक आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या लक्षात येते, ते सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍यांच्या लक्षात येत नाही, असे कसे म्हणता येईल ? याला उत्तरदायी असणार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे !