रत्नागिरीतील कठोर दळणवळण बंदी १५ जुलैपर्यंत वाढवली

रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ या चळवळी अंतर्गत लागू करण्यात आलेली कठोर दळणवळण बंदीची मुदत १५ जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला.

राज्य सरकारने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विद्यापिठांच्या अंतिम वर्षाची परीक्षा घेऊन गोंधळ संपवावा ! – अधिवक्ता विलास पाटणे

विद्यापिठांच्या अंतिम वर्षाची परीक्षा सप्टेंबरपर्यंत घेण्याची सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने केली आहे. राज्य सरकारने या सूचनेनुसार परीक्षा घेऊन परीक्षेचा गोंधळ संपवावा, असे आवाहन येथील अधिवक्ता विलास पाटणे यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले.

कोरोनामुळे एस्.टी. महामंडळातील सहा कर्मचार्‍यांचा मृत्यू

ठाणे विभागात ८४ कर्मचारी कोरोनाबाधित असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई विभागात ६९ जण कोरोनाबाधित असून एका कर्मचार्‍याचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती एस्.टी. महामंडळाने दिली.

संभाजीनगर येथील आस्थापनाच्या विरोधात बार्शी तालुक्यात गुन्हा नोंद

सोयाबीन पिकाचे निकृष्ट प्रतीचे बियाणे शेतकर्‍यांना पुरवठा केल्यामुळे शेतकर्‍यांच्या पिकांची हानी आणि आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी संभाजीनगर येथील ‘ग्रीन गोल्ड सीड्स प्रा. लि.’ या आस्थापनाच्या विरोधात वैराग पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे फेरीवाल्यांना व्यवसायासाठी अनुमती नाही ! – राज्य सरकार

राज्य सरकारने फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास अनुमती द्यावी, याविषयी सरकारला निर्देश देण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे करण्यात आली आहे. त्यावर राज्य सरकारने अशी भूमिका उच्च न्यायालयात मांडली.

अटक केलेले संशयित सचिन अंधुरे आणि भरत कुरणे यांचे जामिनासाठी न्यायालयात आवेदन सादर

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात कोल्हापूर पोलिसांनी अटक केलेले संशयित सचिन अंधुरे आणि भरत कुरणे यांनी जामिनासाठी ८ जुलै या दिवशी अधिवक्ता समीर पटवर्धन यांच्यामार्फत जिल्हा आणि सत्र न्यायाधीश शेळके यांच्याकडे आवेदन सादर केले आहे.

बोगस बियाणे प्रकरणी कृषी सहसंचालकांनी न्यायालयात उपस्थित रहावे, अन्यथा अटकेची कारवाई ! – संभाजीनगर खंडपिठाची चेतावणी

राज्यभरात शेतकर्‍यांना पुरवण्यात आलेल्या बोगस बियाणांचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. याच प्रश्‍नावर विविध माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांकनाची गंभीर नोंद घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने स्वतःहून याचिका (सुमोटो) प्रविष्ट करून घेतली आहे.

नीरव मोदीची ३३० कोटी रुपयांची संपत्ती जप्त

  पंजाब नॅशनल बँकेला (पी.एन्.बी.ला) फसवणार्‍या लंडन येथे पळून गेलेला आर्थिक गुन्हेगार हिरे व्यापारी नीरव मोदी याची  ३३० कोटी रुपयांची संपत्ती अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) जप्त केली आहे.

केंद्र शासनाच्या ग्रामसडक योजनेसाठी राज्याकडून प्रस्ताव गेलेला नाही ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

केंद्र शासनाच्या ग्रामसडक योजनेद्वारे महाराष्ट्रासाठी ६ सहस्र ५५० किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. यासाठी जानेवारी २०२० पर्यंत प्रस्ताव सादर करण्यास राज्य शासनाला सांगण्यात आले होते; मात्र दुर्दैवाने महाराष्ट्रातून प्रस्ताव सादर करण्यात आलेला नाही.

राज्यातील दुकाने उघडी ठेवण्याच्या कालावधीत २ घंट्यांनी वाढ

ग्राहकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन राज्यशासनाने राज्यातील दुकाने आणि बाजार उघडे ठेवण्याचा कालावधी २ घंट्यांनी वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.