जगातील सर्व भाषांमध्ये केवळ संस्कृत भाषेतील उच्चार सर्वत्र सारखे असणे

‘लिहितांना अक्षराचे रूप महत्त्वाचे असते, तसा त्याचा उच्चार करतांना तो महत्त्वाचा असतो. जगातील सर्व भाषांमध्ये केवळ संस्कृत भाषेत याला महत्त्व दिले आहे. त्यामुळे भारतात सर्वत्र वेदोच्चार सारखेच आणि परिणामकारक आहेत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राष्ट्राच्या विकासाचे मोजमापन कसे हवे ?

‘नागरिकांच्या आध्यात्मिक उन्नतीवरून राष्ट्राच्या विकासाचे मोजमापन केले जायला हवे; कारण भौतिक विकास कितीही झाला आणि आत्मिक (किंवा नैतिक) विकास साध्य झाला नाही, तर त्या भौतिक विकासाला काय अर्थ आहे ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे राष्ट्राविषयी विचार !

‘देवाला पहायला चष्मा लागत नाही आणि देवाचे बोलणे ऐकू येण्यासाठी कानाला यंत्र लावावे लागत नाही. त्यासाठी फक्त शुद्ध अंतःकरण लागते. प्रजावत्सल शासनकर्ता तसाच असतो. त्याला दुःखी जनता दिसायला चष्मा लागत नाही आणि जनतेच्या समस्या ऐकू येण्यासाठी कानाला यंत्र लावावे लागत नाही !’

अहं न बाळगता हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी व्हा !

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य करतांना ‘मी करतो’, असा अहं बाळगण्याची आवश्यकता नाही; कारण कालमाहात्म्यानुसार ते कार्य होणारच आहे; पण या कार्यात जे निःस्वार्थीपणे तन-मन-धनाचा त्याग करून सहभागी होतील, त्यांची साधना होऊन ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होतील.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राष्ट्र आणि धर्मप्रेम !

‘व्यक्तीगत प्रेमापेक्षा राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम करून पहा . त्यात अधिक आनंद आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारताचे वेगळेपण !

‘पाश्चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो !’

…तरच हिंदूंमध्ये अभिमान जागृत होईल !

‘भारत ९०० वर्षे पारतंत्र्यात असल्याने हिंदूंच्या कित्येक पिढ्या गुलामगिरीत जगल्या. आता मनातील गुलामगिरीचे विष नष्ट करण्यासाठी हिंदु राष्ट्राची (ईश्‍वरी राज्याची) स्थापना करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणे आवश्यक आहे.

हिंदु राष्ट्रात भारताचा गौरवशाली इतिहास शिकवला जाईल !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे तेजस्वी विचार

हास्यास्पद साम्यवाद !

जिथे पृथ्वीवरची सर्व माणसेच नव्हे, तर झाडे, डोंगर, नद्या इत्यादी एकसारखे दिसत नाहीत, तेथे ‘साम्यवाद’ हा शब्दच हास्यास्पद नाही का ?

लोका सांगे ब्रह्मज्ञान !

‘राष्ट्र-धर्मासंदर्भात इतरांना ‘काहीतरी करा’, असे शिकवणारे; पण स्वतः काही न करणारे पत्रकार ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान । आपण कोरडा पाषाण ॥’ या गटात येतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले