गोव्यात ६०० बसगाड्यांचा तुटवडा असल्याने सार्वजनिक वाहतुकीवर ताण
राज्यातील अनेक भागांत अजूनही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पोचलेली नाही. स्थानिक आमदार वारंवार गावामध्ये बसगाड्या चालू करण्याची मागणी करत आहेत; मात्र बसगाड्यांच्या कमतरतेमुळे ही मागणी पूर्ण झालेली नाही.