नेपाळमध्येही भव्य राममंदिर बांधण्याचे पंतप्रधान के.पी. ओली यांचे निर्देश

नेपाळ सरकार जर भगवान श्रीरामांचे मंदिर बांधत असेल, तर हिंदूंना आनंदच आहे; मात्र त्यामागील उद्देश भारताला शह देण्याचा असेल, तर भगवान श्रीरामाची कृपा ते कदापि संपादन करू शकणार नाही !

चीनकडून नेपाळसाठी ३० कोटी डॉलर्सचा रेल्वे प्रकल्पाचा प्रस्ताव सादर

चीनने नेपाळमधील ल्हासा ते काठमांडूपर्यंत रेल्वे प्रकल्पाचा प्रस्ताव सिद्ध केला आहे. या प्रकल्पाचा व्यय ३० कोटी डॉलर्स इतका आहे. हा रेल्वेप्रकल्प भारत-नेपाळ सीमेजवळील लुंबिनीलाही जोडला जाणार आहे.

(म्हणे) ‘भारतीय विषाणू चीन आणि इटली यांच्यापेक्षा अधिक घातक !’

चीनचे बटीक बनलेले नेपाळचे पंतप्रधान के.पी. ओली शर्मा यांची जीभ पुन्हा घसरली ! चीनच्या विषाणूने नेपाळला कशा प्रकारे गिळंकृत केले आहे, तेच या विधानावरून दिसून येते ! नेपाळमधील असे भारतद्वेषाचे विषाणू नष्ट करण्यासाठी आता भारताने पुढाकार घेतला पाहिजे !