रत्नागिरीत १२ रुग्ण नवीन आढळले : कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३१९

३ जून या दिवशी मिळालेल्या अहवालानुसार १२ रुग्णांचे अहवाल सकारात्मक आले असल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३१९ वर पोचली आहे. नवीन अहवालानुसार कामथे येथील ८, मंडणगड येथील १ आणि संगमेश्‍वर येथील ३ रुग्ण कोरोनाबाधित आढळलेत. तसेच ४७ रुग्णांचे अहवाल नकारात्मक (निगेटिव्ह) आले आहेत.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ ‘माहितीचा अधिकार कार्यशाळे’चे आयोजन !

राष्ट्र, धर्म आणि समाज यांच्या रक्षणासाठी माहितीचा अधिकार या कायद्याची धर्मप्रेमींना माहिती व्हावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीने २३ मे या दिवशी माहितीचा अधिकार कार्यशाळेचे ‘ऑनलाईन’ आयोजन केले होते.

ठाणे येथे महानगर वायू आस्थापनाच्या घरगुती वायू वाहिनीला आग

वायू गळती होऊन महानगर वायू आस्थापनाच्या घरगुती वायू वाहिनीने पेट घेतल्याची घटना २ जून या दिवशी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास येथील वर्तकनगर भागातील रूणवाल प्लाझा परिसरात घडली.

नवी मुंबईत ‘मास्क’ न वापरणार्‍यांवर कारवाई

सार्वजनिक ठिकाणी ‘मास्क’ न वापरणार्‍यांवर, तसेच इतरत्र ठिकाणी थुंकणार्‍यांवर नवी मुंबई महापालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अद्याप १६५ जणांवर कारवाई करून १ लाख ९५ सहस्र ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

मत्स्यसाठे स्थलांतरित होण्याच्या भीतीने पालघर जिल्ह्यातील मासेमारांचे तेल सर्वेक्षणाच्या विरोधात आंदोलन

माशांच्या प्रजननाच्या काळात किनार्‍याजवळच्या प्रजनन होण्यासाठी उपयुक्त ठरणार्‍या भागात या वर्षी तेल सर्वेक्षण होणार आहे. यामुळे मत्स्यसाठे इतरत्र स्थलांतरित होतील, अशी भीती मासेमारांनी व्यक्त केली आहे. ‘अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती’च्या माध्यमातून जिल्ह्यात याविषयी अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले. 

गुप्तचर विभागाचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या हत्येच्या आरोपपत्रात ‘आप’चा नगरसेवक ताहिर हुसेन याच्या नावाचा समावेश  

देहलीत नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात झालेल्या दंगलीत धर्मांधांकडून गुप्तचर विभागाचे कर्मचारी अकिंत शर्मा यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती.

निधन वार्ता

येथील सनातनच्या साधिका सौ. अनिता भाऊसाहेब लटपटे यांचे वडील अशोक बाबूराव बडे (रहाणार पाथर्डी) (वय ५२ वर्षे) यांचे ३१ मे या दिवशी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

चर्च ८ जूनपासून न उघडण्याविषयी आर्चबिशप यांच्याशी बोलेन ! – मायकल लोबो, बंदर कप्तानमंत्री

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर चर्च ८ जूनपासून न उघडण्याविषयी मी गोव्याचे आर्चबिशप यांच्याशी बोलणार असल्याची माहिती बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी दिली आहे.

डोंबिवली (मुंबई) येथून आलेल्या कुटुंबाचा थेट आरोंदा येथे घरात प्रवेश

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘रेड झोन’ म्हणून घोषित केलेल्या डोंबिवली येथून येऊन ग्रामसमितीला कोणतीही पूर्वकल्पना न देता सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा गावातील घरात प्रवेश केलेल्या ८ व्यक्तींच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.

घाऊक मद्यविक्रीची दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास शासनाची मान्यता

शासनाच्या नवीन आदेशानुसार राज्यातील घाऊक मद्यविक्रीची दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास शासनाने मान्यता दिली आहे.