आमच्याविषयी

भारतातील २२ राज्यांत पोहोचणार्‍या ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांची प्रेरणा !

संस्थापक संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी १९९८ या वर्षी ‘सनातन प्रभात’चे रोपटे लावले. ईश्‍वरी कृपेमुळे त्याचा वेगाने विस्तार होत असून आज सनातन प्रभातच्या तेजस्वी विचारांमुळे सहस्रावधी हिंदूंच्या मनात धर्म आणि राष्ट्रतेजाचे वटवृक्षच निर्माण केले आहे.

गेल्या २० वर्षांत ऊन-पाऊस, धर्मद्रोही विचारवंत आणि राजकारणांच्या विरोधाला न जुमानता सनातन प्रभातची नियतकालिके प्रतिदिन वर्षातील ३६५ दिवस अव्याहतपणे चालू आहेत.

‘सनातन प्रभात’चे उद्देश !

 • हिंदूंना धर्मशिक्षण देणे आणि धर्मासाठी संघटित होण्याची दिशा देणे
 • राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी हिंदूंमध्ये जागृती करणे
 • धर्मद्रोही विचारांचे खंडण करणे
 • राष्ट्र-धर्म रक्षणाचे वैध मार्ग सांगणे
 • ‘हिंदू राष्ट्र-स्थापने’साठी दिशा देणे

सनातन प्रभातची एकमेवाद्वितीय वैशिष्ट्ये

 • धर्मजागृती, हिंदूसंघटन आणि राष्ट्ररक्षण यांसाठी साधना म्हणून आर्थिक हानी सोसूनही चालवलेले एकमेव नियतकालिक !
 • हिंदु समाजाच्या हिताची वास्तव आणि वस्तूनिष्ठ अन् आदर्श पत्रकारिता !
 • वृत्तांसमवेत योग्य दृष्टीकोन देऊन वाचकांना कृतीशील करणार्‍या बातम्या आणि लेख !
 • राष्ट्रप्रेम, धर्माचरण आणि साधना यांचे संस्कार करणारे लेखन (मजकूर) !
 • वितरक, वार्ताहर, संपादक आदी सर्वजण विनावेतन सेवारत !
 • वार्ताहर हे केवळ वार्ता पाठवणारे नव्हेत, तर धर्मरक्षणासाठी स्वत: कृतीशील !

‘सनातन प्रभात’चे ध्येय

 • समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्थानासाठी निधर्मी व्यवस्थेत परिवर्तन करण्यास हिंदु समाजाला प्रवृत्त करणे
 • हिंदूसंघटन करून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटिबद्ध असणे
 • रोमारोमांत हिंदुतेज जागवणार्‍या एकमेव ‘सनातन प्रभात’मधील सदरांचे विषय
 • राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचा झंझावात : राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांविषयीचे लिखाण; पाश्‍चात्त्य कुप्रथांना विरोध आणि हिंदु संस्कृतीचे रक्षण; राष्ट्रीय भाषांच्या रक्षणासाठीची वैचारिक चळवळ

धर्मशिक्षण आणि साधना : सण, धार्मिक उत्सव, व्रते आदींविषयी धर्मशिक्षण अन् ईश्‍वरप्राप्तीसाठी योग्य साधना कोणती करावी यांविषयीचे मार्गदर्शन !

संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांना महत्त्व : राजकारण्यांना नाही, तर मानवजातीला चिरंतन आनंद देणारे संत अन् धर्मरक्षण करणारे हिंदुत्वनिष्ठ यांना अधिक महत्त्व !

व्यंगचित्र नव्हे, तर बोधचित्रांचे सदर : समर्थ

सनातन प्रभातचे समाजास आवाहन !

 • ‘सनातन प्रभात’ला स्थानिक वार्ता कळवा !
 • ‘सनातन प्रभात’ हे हिंदूंचे व्यासपिठ आहे. हिंदूहित साधणार्‍या, तसेच राष्ट्र आणि धर्मजागृती करणार्‍या आपल्या परिसरातील वार्ता ‘सनातन प्रभात’ला आवर्जून कळवा !

‘सनातन प्रभात’ला विज्ञापने देणे, हे धर्मदानच !

संतांना, तसेच राष्ट्र आणि धर्म कार्य करणार्‍यांना अर्पण देणे, हा धर्मकार्यातील सहभागच असतो. ‘सनातन प्रभात’ला नियमित विज्ञापने देणे, हेही धर्मदानच होय !

‘सनातन प्रभात’ प्रायोजित करणे, हा धर्मप्रसारच !

नातेवाईक, मित्रमंडळी, परिचित हिंदुत्वनिष्ठ, वाचनालये, सार्वजनिक मंडळे, देवळे आदींना ‘सनातन प्रभात’विषयी माहिती द्या अन् त्यांच्यासाठी अंकांचे प्रायोजक बना !

‘सनातन प्रभात’च्या शिकवणुकीचे सार

‘ब्राह्मतेज’ आणि ‘क्षात्रतेज’ !

ब्राह्मतेजामुळे हिंदु समाज नीतीमान, धर्मनिष्ठ आणि आत्मबलसंपन्न होईल, तर क्षात्रतेजामुळे हिंदु समाजावरील अन्याय आणि राष्ट्राला अधोगतीकडे नेणारी व्यवस्था यांविरुद्ध वैध मार्गाने लढण्याचे बळ मिळेल. ‘ब्राह्मतेज’ आणि ‘क्षात्रतेज’ हे ‘सनातन प्रभात’च्या शिकवणुकीचे सार आणि ‘धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र-स्थापने’चा पाया आहे. – परात्पर गुरु डॉ. आठवले, संस्थापक-संपादक, सनातन प्रभात नियकिालिके